Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधून जेठालालची एक्झिट? मेकर्सनी स्पष्टच सांगितले.. file photo
मनोरंजन

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधून जेठालालची एक्झिट? मेकर्सनी स्पष्टच सांगितले..

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेतील जेठालाल हे पात्र संपवले जाणार असल्याच्या चर्चेमुळे चाहत्यांमध्ये चिंता..

पुढारी वृत्तसेवा

taarak mehta ka ooltah chashmah makers clear dilip joshi jethalaal character will not end

पुढारी ऑनलाईन : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेतील जेठालाल हे पात्र संपवले जाणार असल्याच्या चर्चेमुळे चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती. मात्र, आता मालिकेच्या निर्मात्यांनी या अफवांवर स्पष्ट भूमिका मांडत सत्य सांगितले आहे.

जेठालाल हे 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील सर्वात लोकप्रिय पात्र असून, ही भूमिका अभिनेते दिलीप जोशी साकारत आहेत. जेठालालशिवाय ही मालिका अपुरी वाटते. अलीकडे सोशल मीडियावर जेठालालचे पात्र मालिकेतून काढून टाकले जाणार असल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या. त्यामुळे चाहत्यांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले होते.

जेठालालच्या भूमिकेबाबत मेकर्स काय म्हणाले?

निर्मात्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्ट केले की, जेठालालचे पात्र मालिकेतून हटवले जाणार नाही. सध्या मालिकेची कथा देखील जेठालालभोवती फिरत असून त्याचा प्रोमोही प्रदर्शित झाला आहे. तसेच, 28 जुलै रोजी मालिकेला 18 वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्त विशेष सेलिब्रेशनही आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे जेठालालच्या भूमिकेचा शेवट होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सर्वाधिक मानधन घेणारे कलाकार

ही माहिती समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विविध माध्यमांतील अहवालांनुसार, दिलीप जोशी हे या मालिकेतील सर्वाधिक मानधन घेणारे कलाकार आहेत.

गेल्या काही वर्षांत मालिकेतील अनेक कलाकारांनी शो सोडला असून त्यांच्या जागी नव्या कलाकारांची एंट्री झाली आहे. मात्र, काही कलाकार आजही मालिकेच्या सुरुवातीपासून या प्रवासाचा भाग आहेत.

दिशा वकाणी अनेक वर्षांपासून मालिकेबाहेर

मालिकेतील दयाबेनची भूमिका साकारणाऱ्या दिशा वकाणी अनेक वर्षांपासून मालिकेत दिसलेल्या नाहीत. त्या सुरुवातीला मातृत्व रजेवर गेल्या होत्या; मात्र त्यानंतर त्यांनी पुन्हा मालिकेत पुनरागमन केले नाही. चाहत्यांनी त्यांना परत आणण्याची वारंवार मागणी केली आणि निर्मात्यांनीही त्यांच्याशी संपर्क साधला होता. मात्र, त्या सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात व्यस्त आहेत.

दिशा वकाणींच्या पुनरागमनाबाबत मेकर्सचे वक्तव्य

यापूर्वी मालिकेच्या निर्मात्यांनी सांगितले होते, "दिशा वकाणींचे शोमध्ये पुनरागमन आता खूप कठीण वाटते. लग्नानंतर महिलांचे आयुष्य पूर्णपणे बदलते. लहान मुलांची जबाबदारी आणि घर सांभाळणे सोपे नसते. तरीही मी आशावादी आहे. कदाचित एखादा चमत्कार झाला आणि त्या परत आल्या तर खूप आनंद होईल. पण त्या परत आल्या नाहीत, तर आम्हाला नव्या दयाबेनची निवड करावी लागेल."

दरम्यान, अनेकदा नव्या दयाबेनची एंट्री होणार असल्याच्या बातम्या समोर आल्या. अनेक अभिनेत्रींची नावेही चर्चेत आली. मात्र, आजतागायत दयाबेन हे पात्र मालिकेत परतलेले नाही. त्यामुळे दिशा वकाणी पुन्हा मालिकेत दिसतील, अशी चाहत्यांची आशाही आता जवळपास संपुष्टात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT