पुढारी ऑनलाईन : विवेक अग्निहोत्री यांनी दिग्दर्शित केलेल्या 'द काश्मीर फाईल्स' चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. चित्रपट सिनेमागृहात पोहोचताच चाहत्यांसह काही बॉलिवूड स्टार्संनी आपआपल्या प्रतिक्रिया देत कॉमेन्टस् पाऊस पाडला आहे. यात काही नेटकऱ्यांनी चित्रपटाचे कौतुक केले आहे. तर काही जणांना यातील चित्रपटातील अभिनय पसंतीस उतरला नाही. याच दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर एक ट्विट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केल्याने नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.
'द काश्मीर फाइल्स' चित्रपटाचे नाव न घेता स्वरा भास्करने ट्विटरवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तिने लिहिले आहे की, 'तुमच्या प्रयत्नांच्या 'यशासाठी' एखाद्याने तुमचे अभिनंदन करत आहे असे तुम्हाला वाटत असेल. त्यामुळे कदाचित गेली पाच वर्षे डोके टेकवण्यात घालवू नका. असे तिने म्हटले आहे'. यानंतर स्वराला नेटकऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले आहे.
ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी आपआपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात एका युजर्सने 'अभिनंदन स्वरा! तुम्ही पुन्हा असेच केले. दुसऱ्याच्या यशावर स्वत: यशस्वीपणे लोकांचे लक्ष वेधून घेता. पण माफ करा. यावेळी फक्त १००+ रिट्विट्स. युजर्स काही उपयुक्त कामात बिझी आहेत त्यामुळे ते लक्ष देवू शकत नाहीत.
याशिवाय दुसऱ्या एका युजर्सने 'तू सपोर्ट का करत नाहीस', तर तिसऱ्या एका यूजर्सने 'मला वाटतं की, तुझं सगळं चुकलं स्वरा.' असे लिहिले आहे. याच दरम्यान काही चाहत्यांनी बॉलिवूडमधील अनेक मोठ- मोठे स्टार्सनी चित्रपटाबद्दल कौतुकाचा एक शब्दही का बोलत नाहीत अशा प्रश्न देखील उपस्थित केला आहे. याशिवाय 'तुम्ही शांत कसे राहू शकता' असेही म्हटले आहे.
याशिवाय स्वरा भास्करने आणखी एका ट्विटमध्ये लिहिले की, भारतात 'मुघल' येण्याच्या आधीपासून चालुक्य, गंगा, चोल, पांड्य, पल्लव, चेर, केसरी, राष्ट्रकूट, कलचुरी, कदंब, पाल, प्रतिहार, परमरस यांच्या सत्तेतही एक भयंकर रक्तरंजित लढाई झाली होती. तुमच्या पाठ्यपुस्तकांमध्ये याविषयी काही माहिती सांगितली होती का? असे म्हटले आहे.
स्वराने नुकतेच सोशल मीडियावर बिना मेकअप केलेल्या एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत स्वरा मुहम्मद रफीच्या 'मैं जिंदगी का साथ निभाता चला गया' या प्रसिद्ध गाण्यावर एक्सप्रेशन देताना दिसत आहे. यादरम्यान स्वराचा नो-मेकअप, मॉर्निंग लूक चाहत्यांना पाहायला मिळाला. यासोबतच तिने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये 'हालात इन लाइफ! ?.'??♀️असे लिहिले आहे.
याआधीही स्वरा भास्कर हिजाबच्या वादावरून एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्याने चर्चेत आली होती. या पोस्टमध्ये स्वराने द्रौपदी चिरहरण यांची तुलना हिजाब वादाशी केली होती. तर 'महाभारता द्रौपदीचे वस्त्र हरण करताना सभेतील जबाबदार लोक गप्प का बसले होते. तर यावेळी कायदा कोठे गेला होता? असे म्हटले होते. यानंतर नेटकऱ्यांनी तिला धारेवर धरले होते. सोशल मीडियावर तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.
हेही वाचलंत का?