मनोरंजन

तुझ्या रूपाचं चांदणं : सुरेखा कुडची यांची या मालिकेत एंट्री

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

कलर्स मराठीवर नुकत्याच सुरू झालेल्या तुझ्या रूपाचं चांदणं मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मालिकेत काही दिवसांआधीच "दत्ता"ची एंट्री झाली. रोहित चंद्रा ही भूमिका साकारत असून त्याच्या लुकची चर्चा सगळीकडेच आहे. दरम्यान, या मालिकेत सुरेखा कुडची यांची एंट्री होणार आहे. बिग बॉस मराठीतून बाहेर पडल्यानंतर सुरेखा कुडची यांना नवा प्रोजेक्ट मिळाला आहे.

नक्षत्राला नरकच्या दारातून खेचून, नक्षत्राचं दु:ख दूर कसे करेल, तिचं रक्षण कसं करेल हे मालिकेत बघायला मिळणार आहे. दत्ता आणि नक्षी आता संकट अडकले असून ते या संकटातून कसे बाहेर पडतील हे लवकरच कळेल.

मालिकेमध्ये मयूर मोरे याची भूमिका आपल्या सगळ्यांचा लाडका सुशांत शेलार साकारात आहे. तर आता मालिकेमध्ये अजून एक नवीन एंट्री होणार आहे आणि ती म्हणजे महेश्वरी यांची ही भूमिका कुडची साकारणार आहे.

याविषयी बोलताना त्या म्हणाल्या, आतापर्यंत तुम्ही मला बर्‍याच वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहिले आहे. याचसोबत कलर्स मराठीवर्ल बिग बॉस मराठी पर्व ३ मध्ये तुम्ही मला भरभरून प्रेम दिले. आणि या घरातून बाहेर पडल्यावर मी आता पुन्हाएकदा येते आहे तुमच्या भेटीला एका नव्या भूमिकेत. दत्ताच्या आईची ही भूमिका असून महेश्वरी पाटील ही भूमिका करताना मला मनापासून खूप आनंद होतो आहे. या भूमिकेत एक वेगळेपणा आहे कारण ही स्त्री राजकीय क्षेत्रामध्ये आहे. विषय थोडा वेगळा आहे तुम्हाला हे बघताना नक्कीच कळेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT