मनोरंजन

Big Boss Marathi : 'गुलीगत पॅटर्न' ठरला बिग बॉस मराठी पाचव्या पर्वाचा विजेता!

करण शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : यंदा कलाकारांच्या खेळीपेक्षा सहभागी स्पर्धकांच्या डायलॉगमुळे बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन खूप चर्चेत राहिला. तर याबरोबरच या पर्वाचा होस्ट रितेश देशमुखमुळे या सिझनला चार चाँद लागले. रविवारी (दि.6) या पर्वाचा फिनाले पार पडला. या 70 दिवस चाललेल्या या शोचा विजेता सुरज चव्हाण हा ठरला आहे. तर अभिजीत सावंत हा या शोचा उपविजेता ठरला आहे. या सिझनमध्ये शोच्या टीआरपीने सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. (Big Boss Marathi)

सलमानने केलं रितेशच कौतुक

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाला प्रचंड यश मिळाले आहे. (Big Boss Marathi) हे यश पाहून सलमान खानने रितेशचं विशेष कौतुक केलं आहे. सलमानने रितेश देशमुखसोबत व्हिडीओ कॉलद्वारे मराठीतून संवाद साधला. .यावेळी तो म्हणाला “रितेश भाऊ काय लय भारी होता. या वर्षीचा बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन, एक नंबर होस्टिंग झाली. तुम्ही सर्वांना ‘वेड’ लावलं. तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

हे होते या वर्षीचे स्पर्धक

28 जुलैपासून बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनला सुरुवात झाली होती. एकूण 16 स्पर्धकांनी प्रवेश केला होता. पुरुषोत्तम दादा पाटील, योगिता चव्हाण, निखिल दामले, इरिना रुडाकोव्हा, घन:श्याम दरवडे, वैभव चव्हाण, पंढरीनाथ कांबळे, वर्षा उसगांवकर, अरबाज पटेल, धनंजय पोवार, अंकिता वालावलकर, निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, सूरज चव्हाण, आर्या जाधव या स्पर्धकांनी 28 जुलै रोजी बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली. त्यानंतर संग्रामने वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली. पण यातील एक एक करुन 10 स्पर्धक एलिमिनेट होत गेले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT