Bigg Boss Marathi 5 | ग्रँड फिनालेची संधी हुकली, पॅडी 'बिग बॉस मराठी'च्या घराबाहेर

ग्रँड फिनालेची संधी हुकली, पंढरीनाथ कांबळे 'बिग बॉस मराठी'च्या घराबाहेर
Bigg Boss Marathi 5 show Actor Pandharinath Kamble
Instagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - बिग बॉस मराठी सीझन ५ चा सदस्य आणि विनोदी अभिनेता पंढरीनाथ कांबळेला घराबाहेर जावं लागलं. खूप भावूक होत पंढरीनाथला या शोतून बाहेर पडावं लागलं होतं. आतापर्यंतच्या प्रत्येक गेममध्ये पंढरीनाथने चांगला खेळ खेळला. या आठवड्यात ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सर्वच सदस्य नॉमिनेट होते.

निक्की, सूरज या सदस्यांना सेफ करण्यात आलं होतं. पण अंतिम टप्प्यात या आठवड्यात घरातून कोणता ना कोणता तरी सदस्य बाहेर पडणार होता. शेवटी कोकणकन्या अंकिता वालावलकर आणि पंढरीनाथ कांबळे (पॅडी) या दोन स्पर्धकांमध्ये खेळ रंगला. ‘बिग बॉस’ने अंकिताला सेफ केलं. तर पंढरीनाथ कांबळेला या शोतून बाहेर जावं लागलं.

भावूक झाला पंढरीनाथ कांबळे

‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ मधून निरोप घेताना पंढरीनाथ कांबळे खूप भावूक झाला. तो म्हणाला, ''बिग बॉस मराठीच्या घरातील प्रवासाबद्दल मी आनंदी आहे. आता मी बाहेर पडल. पण अजिबात वाईट वाटत नाही आहे. मी कोणाला दुखावलेल नाही, याचा आनंद आहे. प्रत्येक वेळी मी माझे मुद्दे स्पष्ट मांडले आहेत. प्रत्येक सदस्याचा आदर केला आहे.''

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news