Bigg Boss Marathi Elimination : बिग बॉस मराठीच्या स्पर्धकातील दोघांना एकदमच बाहेरचा रस्ता!

निखिल दामले आणि योगिता चव्हाण बाहेर
Bigg Boss Marathi Elimination
बिग बॉस मराठीPudhari Photo
Published on
Updated on

लोकप्रिय मराठी रिअॅलिटी शो बिग बॉस मराठी’मध्ये एक नवा ट्विस्ट आला आहे. या वर्षी १६ स्पर्धकांनी या शोमध्ये प्रवेश घेतला होता. यामध्ये पहिल्याच आठवड्याच पुरुषोत्तम दादा पाटील घरातून बाहेर पडले होते. आता दुसऱ्या आठवड्यामध्ये घरातून कोण बाहेर पडणार याची उत्कंठा सर्व प्रेक्षकांना लागून आहे. परंतु, दुसऱ्या आठवड्यात रितेश देशमुखने एक नवीन ट्विस्ट सदस्यांना सांगितला. या आठवड्यामध्ये घरातून एकदम दोन स्पर्धक बाहेर पडले आहेत.

Bigg Boss Marathi Elimination
BBMarathi : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये होणार सेलिब्रेशन!

रमा माधव फेम निखिल दामले घराबाहेर

रविवारी रंगलेल्या भाऊचा धक्का वेळी रितेश देशमुख सर्वांना धक्का देतो. तसेच सांगतो की, या आठवड्यात 'डबल एव्हिक्शन' होणार आहे. बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या आठवड्यात बाहेर पडलेला स्पर्धक निखिल दामले असल्याचं रितेश जाहीर करतो आणि योगिताही डेंजर झोनमध्ये असल्याचं रितेश सांगतो.

Bigg Boss Marathi Elimination
Big Boss OTT3 : बिग बॉस ओटीटीच्या ट्रॉफीवर सना मकबुलने कोरले नाव

डबल एव्हिक्शनमधला दुसरा धक्का

या आठवड्यामध्ये असणाऱ्या 'डबल एव्हिक्शन' मध्ये दोन धक्के बसणार आहेत. त्यातील पहिला धक्का हा निखिल दामलेच्या बाहेर जाण्याने सर्व प्रेक्षकांना बसला आहे. तर दुसरा कोण बाहेर जाणार याची भिती सर्वांना लागून होती. यानंतर रितेश जाहीर करतो की सूरज आणि अभिजीत सुरक्षित झाले असून, योगिता चव्हाण या घरातून बाहेर जाते आहे. बाहेर आल्यानंतर तर योगिता म्हणते की, मला खेळ समजता आला नाही म्हणून मी बाहेर जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news