Surabhi Samriddhi chinki minki separate ways
मुंबई - द कपिल शर्मा शो फेम चिंकी-मिंकी म्हणजेच सुरभी आणि समृद्धी मेहरा यांना कुणी ओळखत नाही. दोघी जुळ्यांनी आपल्या फॅशनने आणि अभिनयाने सर्वांचं मन जिंकलचं होतं. पण, अगदी हुबेहुब एकसारखे दिसणे ही त्यांची खासियत आहे. त्यामुळेच सुरभी-समृद्धीला लोक चिंकी कोण आणि मिंकी कोण, हे ओळखणेही कठीण जायचे. एकसारखा पेहराव आणि बोलीही सारखीच त्यामुळे अनेकांची फसगत व्हायची. अनेक शोज आणि मोठमोठ्या कार्यक्रमांतून एकत्र येऊन आपले कौशल्य दाखवणाऱ्य चिंकी-मिंकी यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.
चिंकी-मिंकीइन्स्टाग्रामवरील रीलमधून लोकांना एंटरटेन करायच्या. आत वृत्त आहे की, दोघी आता वेगवेगळ्या झाल्या आहेत. दोघींनीही आपापल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर याविषयी एक पोस्ट शेअर केलीय. ही पोस्ट पाहून फॅन्स चिंतेत झाले आहेत. दोघींना एकत्र पाहणं, हेच त्यांच्यातील वेगळेपण दर्शवत होतं. सुरभी-समृद्धीने पोस्टमध्ये लिहिलंय की, त्या दोघी वेगळ्या झाल्या आहेत. पण त्यांनी हे पाऊल का उचललं, याबद्दल माहिती दिलेली नाही.
चिंकी-मिंकी कपिल शर्मा शोमधून लाईमलाईटमध्ये आल्या होत्या. शिवाय इन्स्टाग्राम व्हिडिओ, रिल्समधूनही त्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पाहिले जर अनेक स्टायलिश, फॅशनेबल फोटोज पाहायला मिळतात.
सुरभी - समृद्धी दोघी जुळ्या बहिणी आहेत. त्या दिसायला सारख्या असल्यामुळे सहजपणे त्यांना कुणीही ओळखू शकत नाही. त्यांना चिंकी मिंकी नावाने अधिक ओळखले जाते. या दोन्ही बहिणी आधी टिक-टॉकवर एकत्र व्हिडिओ बनवायच्या. त्यामुळे त्या खूप लोकप्रिय ठरल्या होत्या.