Sunny Deol Gabru Clash Bobby Deol Bandar  instagram
मनोरंजन

Sunny Deol Gabru Clash Bobby Deol Bandar | बॉक्स ऑफिसवर 'देओल ब्रदर्स' आमने-सामने, 'गबरू', 'बंदर' कोण मारणार बाजी?

Sunny Deol Gabru Clash Bobby Deol Bandar | बॉक्स ऑफिसवर 'देओल ब्रदर्स' आमने-सामने, 'गबरू', 'बंदर' कोण मारणार बाजी?

स्वालिया न. शिकलगार

बॉलीवूडमध्ये देओल ब्रदर्सची मोठी टक्कर पाहायला मिळणार आहे. सनी देओलचा ‘गबरू’ आणि बॉबी देओलचा ‘बंदर’ हे दोन्ही चित्रपट एकाच सुमारास प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर कोण बाजी मारणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे. दोघांच्याही अलीकडील यशामुळे ही स्पर्धा अधिकच रंगतदार ठरणार आहे.

चित्रपटांचे क्लॅश ही काही नवी गोष्ट नाही. पण दोन सख्ख्या भावांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर आमने-सामने असतील तर त्यांच्या फॅन्ससाठी हे रंजक ठरणार आहे. बॉलीवूडमध्ये अनेकदा मोठ्या स्टार्सचे चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित होतात आणि बॉक्स ऑफिसवर चुरस निर्माण होते. यावेळी मात्र स्पर्धा खास आहे.हे चित्रपट आहेत, सनी देओल आणि बॉबी देओल यांचे अनुक्रेम गबरु आणि बंदर. २०२६ मध्ये मे महिना गाजणार आहे. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर क्लॅश होणार आहेत. (Entertainment)

बॉलीवूड अभिनेता सनी देओल 'गबरू' चित्रपटातून भेटीला येत आहे. तर त्याचा छोटा भाऊ, अभिनेता बॉबी देओल 'बंदर' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

सनी देओलचा गबरू रिलीज डेट

'बॉर्डर २' च्या्रचंड यशानंतर सनी देओल 'गबरू' मधून भेटीला येत आहे. हा चित्रपट ८ मे २०२६ रोजी रिलीज होणार आहे. गबरू चित्रपट शशांक उदयपुरकरने दिग्दर्शित केला आहे. विशाल राणा आणि ओम छंगानी यांची निर्मिती आहे.

बॉबी देओलचा बंदर चित्रपट कधी रिलीज होणार?

दुसरीकडे बॉबी देओलच्या बंदर चित्रपटाची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. २२ मे, २०२६ रोजी 'बंदर' रिलीज होईल. अनुराग कश्यपचा हा चित्रपट 'गबरू' रिलीजच्या १४ दिवसांनी येणार आहे.

कोण मारणार बाजी?

दोन चित्रपट जेव्हा मोठ्या पडद्यावर एकत्र येतात, त्यावेळी त्यांच्यात क्लॅश पाहणं रंजक ठरतं. अभिनय, स्टंट्स, कहाणी, डायलॉग्ज, दृश्ये सर्व काही गोष्टींची तुलना एकमेकांशी केली जाते. आता सनी आणि बॉबी या दोन्ही अभिनेत्यांचा चाहता वर्ग वेगवेगळा आहे. त्यामुळे मे महिन्यात चाहत्यांमधील क्रेझ आणखी पाहायला मिळणार आहे. देओल ब्रदर्सपैकी ‘गबरू’ की ‘बंदर’ - कोण मारणार बाजी, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT