Sunjay Kapur net worth controversy
मुंबई - अभिनेत्री करिश्मा कपूरचा एक्स पती दिवंगत संजय कपूर यांच्या संपत्तीचा विषय समोर आला आहे. संजय कपूर यांच्या ३० हजार कोटी रुपयांच्या संपत्तीचा उत्तराधिकार कोण यावरून वारस वाद सुरु असताना करिश्मा कपूरचीही चर्चा होऊ लागली. वृत्तानुसार, एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला होती की, करिश्मा कपूरने संपत्तीत हिस्सा मागितला होता. आता त्यांच्या जवळच्या सूत्राने याबद्दल काय माहिती दिलीय, जाणून घेऊया.
अभिनेत्री करिश्मा कपूरने २००३ मध्ये संजय कपूरशी लग्न केले होते. त्यांचा २०१६ मध्ये घटस्फोट झाला. त्यांना दोन मुले समायरा आणि कियान आहेत. वेगळे झाल्यानंतर संजय कपूर यांनी प्रिया सचदेवशी लग्न केले होते. संजय कपूर हे ३.६ अब्ज डॉलर्सच्या सोना कॉमस्टार ग्रुपचे अध्यक्ष होते. त्यांचे १२ जून रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर ३०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मालमत्तेचा मोठा वाद निर्माण झाला.
आता दिवंगत उद्योजक संजय कपूर यांच्या संपत्तीची चौकशी सुरू आहे. दरम्यान, करिश्माने संपत्तीत हिस्सा मागितल्याची माहिती समोर आली होती. पण, सूत्रांनुसार, हा दावा फेटाळण्यात आला आहे. संजय यांच्या संपत्तीशी संबंधित सर्व चर्चांना ठामपणे नकार देण्यात आलाय.
कुटुंबाच्या जवळच्या सूत्रांनी एका इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या माहितीनुसार, करिश्मा कपूरचा संजय यांच्या मालमत्तेशी संबंधित कोणत्याही बाबींमध्ये सहभाग नाही. मुलेच खरे उत्तराधिकारी आहेत आणि त्यांना त्यांचा हक्क मिळेल. करिश्माचे लक्ष आता केवळ मुलांच्या कल्याण आणि भविष्यावर आहे, असे सांगण्यात आले आहे.
एका रिपोर्टनुसार, संजय कपूर यांच्या आई राणी कपूर कपूर सोना ग्रुपच्या मुख्य आहेतय आपल्या मुलाच्या दु;खात असताना काही कागदपत्रांवर सह्या करण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला होता. संजय यांच्या निधनानंतर त्यांची संपत्ती लाटम्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांनी दावा केला की, सोना ग्रुपमध्ये त्यांची हिस्सेदरी आहे आहे. परिवाराच्या संपत्तीच्या त्या एकमेव उत्तराधिकारी आहेत.