मनोरंजन

Vaathi Poster Out: धनुषच्या बर्थडे आधी फॅन्ससाठी गिफ्ट

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथचा सुपरस्टार धनुष (Vaathi Poster Out) ला कुठल्याही ओळखीची गरज नाही. त्याने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर रुंजी घातलीय. तो सध्या 'द ग्रे मॅन' वरून चर्चेत आहेत. आता तो 'वाथी' (Vaathi Poster Out) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. वाथीच्या निर्मात्यांनी धनुषच्या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज केले आहे, या पोस्टरची चर्चा होत आहे.

ट्रेड ॲनालिस्ट तरण आदर्श यांनी 'वाथी' चित्रपटातील धनुषचा फर्स्ट लूक रिलीज केलाय त्यांनी ट्विट केले की, चित्रपटातील धनुषचे पोस्टर रिलीज झाले आहे. यासोबतच चित्रपटाचा टीझर कधी प्रदर्शित होणार आहे. या ट्विटनंतर चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल प्रचंड चर्चा आहे. 'वाथी' चित्रपटात, तो एका शिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

पोस्टरमध्ये तो खुर्चीवर बसलेला असून अनेक पुस्तके ठेवली आहेत. तसेच पेन घेऊन काहीतरी विचार करत लिहित असल्याचेही या पोस्टरमध्ये दिसत आहे. अभिनेता धनुषचे पात्र खूप मनोरंजक आहे. धनुषने हातात फक्त घड्याळ घातले असून त्याची साधी स्टाईल लोकांच्या पसंतीस उतरली आहे. धनुषच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तो अनेक प्रोजेक्ट्सवर काम करत आहे ज्यामध्ये तो लवकरच दिसणार आहे.

धनुषची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोअर्स आहेत. लोकही त्याच्या स्टाईलचे वेडे आहेत. इतकंच नाही तर लोक त्याच्या हसण्यावरही मोहित होतात. धनुष मोठ्या पडद्यावर काय जादू करतो, हे चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT