मनोरंजन

विरजण चित्रपट : दाक्षिणात्य गायिका मंगलीने गायले देवा मराठी गाणे

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रत्येक नाण्याला जशा दोन बाजू असतात तशाच प्रेमालाही आहेत. प्रेम करणं ते टिकवणं आणि निभावणं या गोष्टी वाटतात तितक्या सोप्या नाहीत याची जाणीव या चित्रपटातून अभिनेत्री शिल्पा ठाकरे आणि अभिनेता सोहम चाकणकर यांची फ्रेशजोडी करून देणार आहे.

नुकताच या चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा पुणे येथे पार पडला. संगीतकार अनु मलिक यांच्या हस्ते या सोहळ्याचे उदdघाटन करण्यात आले. डॉ. संजय चोरडिया, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले, महाराष्ट्र राज्य बाजार समितीचे संचालक प्रवीणकुमार नाहटा, प्रदीपजी नाहर, जुगराजजी जैन, महेंद्रजी पातारे तसेच 'विरजण' चित्रपटातील कलाकार आणि चित्रपटाची टीम यांनी सोहळ्याला उपस्थित होती.

कोणत्याही कलाकृतीला भाषा, प्रांत कशाचंही बंधन नसतं, असं म्हटलं जातं. आणि याची पुन्हा एकदा नव्याने जाणीव तेलुगू गायिका सत्यावथी मंगली हिने करून दिली आहे. 'विरजण' या चित्रपटातील 'देवा' या गाण्याला मंगलीने सुमधुर स्वरात स्वरसाज चढवलाय. प्रशांत सातोसे यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. तर या गाण्याचे बोल विनायक पवार लिखित आहेत.

दुर्गेश राजभट्ट याने या गाण्याची म्युझिक प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळली आहे, देवा या गाण्याला मिळालेल्या मंगलीच्या आवाजासह शिल्पा आणि सोहमनेसाथ दिलीय. 'जैन फिल्म प्रॉडक्शन' प्रस्तुत निर्माते सागर जैन, ऋषभ कोठारी, राजू तोडसाम निर्मित आणि दिग्दर्शक कपिल जोंधळे दिग्दर्शित हा चित्रपट आहे. चित्रपटाची कथा लेखक नितीन सूर्यवंशी यांनी लिहिली आहे. संगीत प्रशांत सातोसे यांनी दिले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT