Betting Apps Case ED questioning to celebs  Instagram
मनोरंजन

Betting Apps Case | बेटिंग ॲप्स प्रचार प्रकरणी सोनू सूद-उर्वशी रौतेलाची ईडी चौकशी

Betting Apps Case ED Urvashi Rautela-Sonu Sood | बेटिंग ॲप्स प्रचार प्रकरणी सोनू सूद-उर्वशी रौतेलाची ईडी चौकशी, हरभजन सिंह-युवराजचे देखील नाव समोर

स्वालिया न. शिकलगार

Betting Apps Case ED questioning Urvashi Rautela-Sonu Sood others

मुंबई - ईडीने बेटिंग ॲप्स प्रमोट प्रकरणी सोनू सूद, उर्वशी रौतेला यांची चौकशी केलीय. यामध्ये काही क्रिकेटर्स हरभजन सिंह, सुरेश रैना, युवराज सिंहचे नाव देखील समोर आले आहे. बेकायदेशीर ऑनलाईन बेटिंग ॲप्स संबंधित ईडीने आपला तपास आणखी वाढवला आहे. ईडी अधिकाऱ्यांनी अभिनेता सोनू सूद, अभिनेत्री उर्वशी रौतेलाची चौकशी केल्याची माहिती समोर आलीय. माजी भारतीय क्रिकेटर हरभजन सिंह, युवराज सिंह, सुरेश रैना यांची देखील चौकशी झाली. बेटिंग ॲप्सचा प्रचार करण्यासंदर्भात त्यांना प्रश्न विचारण्यात आल्याचे समजते, जे बॅन करण्यात आले होते. या बॅन ॲप्समध्ये xBet, फेयरप्ले, परिमॅच आणि लोटस 365 सहित अनेक ॲप्स आहेत.

सूत्रांनुसार, 'बेटिंग प्लॅटफॉर्म्स जाहिरात कॅम्पेन्समध्ये 1xbat आणि 1xbat सारखे स्पोर्टिंग लाईन्सचा वापर करण्यात आला होता. एक प्रकारचे जाहिरातीत क्यू-आर कोड असतात, जे युजर्सना सट्टेबाजी साईट्सवर री-डायरेक्ट करतात. हे भारतीय कायद्याचे उल्लंघन ठरते.'

अन्य स्टार्सना देखील नोटिस

अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'काही प्रसिद्ध सेलेब्सना आधीच नोटिस जारी करण्यात आले आहेत. तर अन्य सेलेब्सना लवकरच नोटिस जारी करण्याची शक्यता आहे.'

ईडी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, हे प्लॅटफॉर्म नेहमी स्वत:ला स्किल-बेस्ड गेम म्हणून प्रमोट करतात. पम ते लक बेस्ड आऊटवर काम करतात. यामध्ये फसवणूक एल्गोरिदमचा वापर होतो. कायद्यानुसार अशी कामे जुगार म्हणून वर्गीकृत केले जाते.

सेलिब्रिटींच्या जाहिरातींमुळे लोकप्रियता

सरकारी बंदीकडे दुर्लक्ष करूनही, या प्लॅटफॉर्मना सेलिब्रिटी आणि प्रभावशाली लोकांसोबत भागीदारी करून प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. 1xBet ही सर्वात जास्त प्रमोट केलेल्या संस्थांपैकी एक असल्याचे म्हटले जाते.

ईडीच्या रडारवर काही मीडिया संस्था देखील आहेत. त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात पैसे देऊन अशा जाहिराती प्रकाशित करण्याचा आरोप आहे. ईडीने माध्यम आउटलेट्स आणि जाहिरात कंपन्यांना ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा देवाणघेवाण ट्रॅक केला आहे. अधिक व्यवहारांची चौकशी सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT