मनोरंजन

Sonu Sood : हिमाचलमध्ये स्ट्रॉबेरी विक्रेताकडे पोहोचला सोनू सूद, पुढे काय झालं पाहा

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : सर्वसामान्यांचा 'मसिहा' म्हणून अभिनेता सोनू सूदची अनोखी ओळख झाली आहे. सोनू पुन्हा एकदा एका व्हिडिओमधून चर्चचा विषय ठरला आहे. पुन्हा एकदा तो अनेक छोट्या व्यवसायांना प्रमोट करताना दिसतोय. काही दिवसांपूर्वी त्याच्या सोशल मीडिया हँडलवर रस्त्याच्या कडेला असलेल्या एका कॉर्न विक्रेत्या सोबत त्याने एक व्हिडिओ केला आणि त्याच्या छोटे उद्योगाला चालना देण्याचं आव्हान केलं. (Sonu Sood) त्याने आता हिमाचल प्रदेशातील एका तरुण स्ट्रॉबेरी विक्रेत्याला स्पॉटलाईट करून देणारा व्हिडिओ सोशल मीडिया वर पोस्ट केला आहे. यातून पुन्हा सोनूने आपण आपल्या देशातल्या लघु उद्योगांना प्रोत्साहन दिलं पाहिजे याचा अनोखा संदेश दिला आहे. (Sonu Sood)

सोनू सूदने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला होता. जो बिहारमधील स्ट्रॉबेरी विक्रेत्याच्या शेजारी उभा राहून त्याचा खरा उत्साह प्रतिबिंबित करतो आणि "एक बिहारी सब पे भारी" असे म्हणत इतरांना व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देणारा हा व्हिडिओ होता. आजवर सोनू ने अनेक लोकांना त्यांच्या कामातून प्रेरणा दिली आणि तो फक्त कलाकार भूमिकेपलिकडे जाऊन एक समाजसेवक झाला आहे.

SCROLL FOR NEXT