Sitaare Zameen Par Song released  Instagram
मनोरंजन

Sitaare Zameen Par Song |'सितारे जमीन पर' रोमँटिक गाण्यात आमिर-जेनेलियाची केमिस्ट्री

Sitare Zameen Par Sar Aankhon Pe Mere Song | आमिर खानच्या ‘सितारे जमीन पर’ चित्रपटातील 'सिर आंखों पर' गाणे रिलीज झाले आहे

स्वालिया न. शिकलगार

Sitare Zameen Par Sar Aankhon Pe Mere Song released

मुंबई - आमिर खानचा चित्रपट ‘सितारे जमीन पर’मधील गाणे ‘सिर आंखों पर’ रिलीज झाले आहे. गाण्याचे बोल आणि कहाणी खूप चांगली आहे. हा चित्रपट २० जून रोजी थिएटरमध्ये रिलीज होईल.

हा चित्रपट २००७ चा सुपरहिट तारे जमीन पर चित्रपटाचा सीक्वल आहे. आता निर्मात्यांनी चित्रपटातील एक गाणे सर आँखों पे मेरे रिलीज केलं आहे. या मेलोडियस गाण्यात जेनेलिया आणि आमिर खान यांची केमिस्ट्री पाहायला मिळतेय. अरिजीत सिंहच्या जादूई आवाजात सर आँखों पे मेरे एक रोमँटिक ट्रॅक आहे.

१० रायझिंग स्टार्स अरूष दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, सम्वित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भन्साली, आशीष पेंडसे, ऋषी शाहानी, ऋषभजैन, नमन मिश्रा, सिमरन मंगेशकर यांच्या भूमिका असणार आहेत. आर. एस. प्रसन्ना द्वारा दिग्दर्शित आमिर खान प्रोडक्शन्स सोबत 'सितारे जमीन पर' पडद्यावर आणत आहेत. आमिर खान आणि जेनेलिया डिसुझा मुख्य भूमिकेत असणार आहेत.

चित्रपटातील गाणी अमिताभ भट्टाचार्य यांची असून संगीत शंकर-एहसान-लॉय यांनी दिले आहे. स्क्रीनप्ले दिव्य निधी शर्माने लिहिलं आहे. चित्रपटाची निर्माती आमिर खान आणि अपर्णा पुरोहितने रवि भागचंदका यांच्यासोबत केलीय. चित्रपट २० जून, २०२५ रोजी चित्रपटगृहात रिलीज होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT