

मुंबई - भारतीय प्रेक्षकांना काही अविस्मरणीय प्रेमकथा देणाऱ्या यशराज फिल्म्स (YRF) चा आगामी चित्रपट ‘सैयारा’ या शुक्रवारी टीझरच्या रूपात आपली पहिली झलक दाखवणार आहे. हा चित्रपट प्रसिद्ध दिग्दर्शक मोहित सूरी यांनी दिग्दर्शित केला असून, प्रेमकथेचा गहिरा अनुभव देणार आहे.
सैयारा या चित्रपटामधून अहान पांडे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असून, त्यांच्या समवेत अनीत पड्डा मुख्य भूमिकेत आहे. अनीत ने वेब सिरीज बिग गर्ल्स डोंट क्राई मधून प्रेक्षकांची मनं जिंकली होती. या चित्रपटाची निर्मिती यशराज फिल्म्स चे सीईओ अक्षय विधानी यांनी केली आहे.
चित्रपट १८ जुलै, २०२५ रोजी जगभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रचार मोहिमेची सुरुवात ३० मे, शुक्रवार रोजी टीझर रिलीजने होणार आहे.