Aamir Khan Sitaare Zameen Par first look revealed
मुंबई :
'मिस्टर परफेक्टशनिस्ट' आमिर खानने मोठ्या पडद्यावर धमाकेदार वापसी केलीय. 'सितारे जमीन पर' चित्रपटाचे पहिले पोस्टर त्याने जारी केले असून प्रदर्शनाची तारीख देखील घोषित केलीय. निर्मात्यांनी एक पोस्ट शेअर करून लोकांना विचारलं होतं की, ‘क्या आप हमारे सितारे के लिए तैयार हैं?’ यावरून अंदाज लावला जात आहे की, आता चित्रपटाचे ट्रेलर लवकरच येईल.
पोस्टरवर आमिर खान दिसत असून अनेक नवे चेहरे दिसत आहेत. हे कलाकार या चित्रपाटतून बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार आहेत. आमिर खान सोबत १० जण पोस्टरमध्ये दिसत आहेत. आमिर खान प्रोडक्शन्सने इन्स्टाग्राम पोस्ट केली आहे. अरौश दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, संवित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भन्साळी, आशीष पेंडसे, ऋषि शाहनी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर असे १० नवे चेहरे चित्रपटात दिसणार आहेत.
दीर्घकाळानंतर ‘सितारे जमीन पर’ सोबत आमिर खान वापसी करत आहे. त्याचा चित्रपट ‘लाल सिंह चड्ढा’ बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही. यावेळी तो जेनेलिया डिसुजासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.
नव्या पोस्टरसोबतच ‘सितारे जमीन पर’ चित्रपट २० जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. आमिरचे फॅन्स हा चित्रपट ब्लॉकबस्टर होणार असल्याचे सांगत आहे. सोबत ट्रेलर प्रदर्शित करण्याची मागणी करत आहेत.