Sidharth Malhotra-Janhvi Kapoor  Instagram
मनोरंजन

Sidharth Malhotra-Janhvi Kapoor | लालबागचा राजाच्या चरणी सिद्धार्थ-जान्हवी, जॅकलीन-अवनीत देखील दर्शनाला

Ganeshotsav Celebration| लालबागचा राजाच्या चरणी सिद्धार्थ-जान्हवी, नुसरत देखील दर्शनाला

स्वालिया न. शिकलगार

Sidharth-Janhvi Visits Lalbaugcha Raja

मुंबई : सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूर यांनी मुंबईच्या लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. गुरुवारी, या दोन्ही कलाकारांचा आगामी चित्रपट 'परम सुंदरी'च्या यशासाठी जान्हवी-सिद्धार्थने बाप्पांचा आशीर्वाद घेतला. दोघे लालबागच्या राजाच्या चरणी पोहोचले. यावेळी अभिनेत्री नुसरत भरूचाने देखील लालबागचा राजाचे आशीर्वाद घेतले.

गर्दीत जान्हवी कपूर अस्वस्थ?

सिद्धार्थ-जान्हवीचे बाप्पाच्या दर्शनाचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जान्हवीने लाल रंगाची पैठणी नेसली होती तर गुलाबी रंगाच्या कुर्ता सिद्धार्थने परिधान केला होता. प्रचंड गर्दीत जान्हवी-सिद्धार्थ मार्ग काढत बाप्पाच्या चरणी लीन झाले.

नुसरत, दीपवीरने देखील घेतले दर्शन

अभिनेत्री नुसरत भरूचा बाप्पांच्या दर्शनासाठी पोहोचली. दरम्यान, दीपिका पदुकोन आणि रणवीर सिंह दोघे दर्शनाला पोहोचले. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

गर्दीत अडकले जॅकलीन-अवनीत

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आणि अवनीत कौर पहिल्याच दिवशी बाप्पांच्या दर्शनासाठी पोहोचली. पण त्या गर्दीत अडकल्याचे दिसते, त्यांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होताना दिसताहेत. व्हिडिओमध्ये दिसते की, जॅकलीन-अवनीत कौर लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्यानंतर मंडपमधून बाहेर येतात, त्यावेळी त्या गर्दीत आडकतात. आणि मंडप बाहेर रस्त्यावर येण्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागते. मंडपाचे सुरक्षारक्षक आणि स्वयंसेवक त्यांना सुरक्षितपणे बाहेर जाण्याचा मार्ग दाखवतात. यावेळी निर्माते राघव शर्मा देखील स्पॉट झाले.

video -Viral Bhayani इन्स्टाग्राम वरून साभार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT