Siddharth jadhav on nagraj manjule  instagram
मनोरंजन

Siddharth jadhav | सिद्धार्थ जाधवच्या आयुष्यातील 'ती' पहिली गोष्ट अन् नागराज मंजुळेंचा विश्वास; 'दगडू विचारे'च्या भूमिकेमागची इमोशनल गोष्ट समोर

Siddharth jadhav | सिद्धार्थ जाधवच्या आयुष्यातील 'ती' पहिली गोष्ट आणि नागराज मंजुळेंचा विश्वास; 'दगडू विचारे'च्या भूमिकेमागची इमोशनल गोष्ट समोर

स्वालिया न. शिकलगार

सिद्धार्थ जाधवने नागराज मंजुळेंच्या 'मटका किंग'मध्ये 'दगडू विचारे' ही महत्त्वाची भूमिका साकारली आहे. ही केवळ एक कास्टिंग अपडेट नसून, एका अभिनेत्याचा आपल्या लाडक्या दिग्दर्शकावर असलेला विश्वास आहे. सिद्धार्थने नागराज यांच्याच शैलीत "शुक्रिया सेठ... भरोसा रखने के लिये" म्हणत दिलेली दाद ही बातमी जुनी झाली असली तरी त्यातील 'इमोशनल कनेक्ट' प्रेक्षकांना नक्कीच भावणारा आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील 'एनर्जी मशीन' म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सिद्धार्थ जाधव सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. निमित्त आहे नागराज मंजुळे दिग्दर्शित 'मटका किंग' ही आगामी वेब सीरिज. या सीरिजच्या माध्यमातून सिद्धार्थ त्याच्या करिअरमधील एका महत्त्वाच्या वळणावर उभा आहे. सिद्धार्थने ज्या पद्धतीने नागराज मंजुळे यांचे आभार मानले आहेत, सिद्धार्थने खूपच भावनिक जी पोस्ट लिहिलीय, ते पाहून इमोशनल होण्यासारखे आहे.

सिद्धार्थने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपली भावना व्यक्त केली आहे. "प्रत्येक नटाची इच्छा असते की त्याने एकदा तरी नागराज मंजुळे यांच्यासोबत काम करावं," असं म्हणत सिद्धार्थने आपल्या आनंदाला वाट करून दिली. विशेष म्हणजे, सिद्धार्थ जाधवच्या आयुष्यातील ही पहिलीच वेब सीरिज आहे आणि तिचे दिग्दर्शन स्वतः नागराज मंजुळे करत आहेत, हा त्याच्यासाठी दुग्धशर्करा योग ठरला आहे.

'दगडू विचारे' आणि नागराज यांचा विश्वास

या सीरिजमध्ये सिद्धार्थ 'दगडू विचारे' नावाची भूमिका साकारत आहे. ही भूमिका त्याला दिल्याबद्दल त्याने नागराज यांचे आभार मानले आहेत. पण त्याचे आभार मानण्याची पद्धत हटके होती. नागराज मंजुळेंनीच लिहिलेला एक डायलॉग त्यांनाच ऐकवत सिद्धार्थ म्हणाला, "शुक्रिया सेठ... काम देने के लिये नही, भरोसा रखने के लिये!" ही ओळ सध्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

दिग्गज कलाकारांची मांदियाळी

'मटका किंग'मध्ये केवळ सिद्धार्थच नाही, तर विजय वर्मा, सई ताम्हणकर, कृतिका कामरा, गुलशन ग्रोवर यांसारख्या बॉलिवूडमधील बड्या नावांसोबतच भरत जाधव, गिरीश कुलकर्णी, किशोर कदम यांसारख्या दिग्गज मराठी कलाकारांची फौज आहे. सिद्धार्थ रॉय कपूर आणि अश्विनी अय्यर तिवारी सारखे निर्मात्यांचा हा प्रोजेक्ट आहे.

सिद्धार्थ जाधव आणि नागराज मंजुळे हे दोन्ही कलाकार जमिनीशी जोडलेले आहेत. सिद्धार्थने ही पोस्ट केवळ माहिती म्हणून नाही, तर एका संघर्षातून आलेल्या अभिनेत्याची कृतज्ञता म्हणून लिहिली आहे. 'मटका किंग'मध्ये सिद्धार्थचा 'दगडू विचारे' काय राडा करणार आणि नागराज मंजुळे या अस्सल मराठी अभिनत्याचा अभिनय हिंदी वेब सीरिजमध्ये कसा असणार, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT