अभिषेक बच्चन आणि शोएब अख्तर  pudhari
मनोरंजन

Abhishek Bachchan: अभिषेक शर्मा ऐवजी शोएब अख्तर अभिषेक बच्चन म्हणाला अन् नेटकऱ्यांनी घेतली फिरकी; अभिषेकची कमेंटही चर्चेत

शोएब अख्तरकडून अभिषेक शर्माचा उल्लेख हा अभिषेक बच्चन म्हणून केला गेला

अमृता चौगुले

सध्या सगळीकडे आशिया कपची धूम आहे. येत्या रविवारी भारत आणि पाकिस्तानमध्ये अंतिम सामना खेळला जाणार आहे. पण या सगळ्या गोंधळात चर्चेत आहे ते अभिषेक बच्चन. त्याचे झाले असे की न्यूजरूममध्ये चर्चा करत असताना शोएब अख्तरकडून अभिषेक शर्माचा उल्लेख हा अभिषेक बच्चन म्हणून केला गेला. (Latets Entertainment News)

शोएब म्हणाला, ‘ जर पाकिस्तानने अभिषेक बच्चनला लवकर आऊट करू शकला तर मिडल ऑर्डरचे काय होईल? त्यांचा मिडल ऑर्डर आतापर्यंत चांगले प्रदर्शन करू शकलेला नाही. हे ऐकताच सगळे पॅनल हास्यकल्लोळात बुडून गेले. खरेतर शोएबला अभिषेक शर्मा म्हणायचे होते. पण त्याने गोंधळात अभिषेक बच्चनचे नाव घेतले.

या संवादाची क्लिप व्हायरल होताच नेटीझन्सनी कमेंट्स पाऊस पडला. इतकेच कशाला अभिषेक बच्चननही शोएबच्या या गोंधळावर कमेंट केली आहे. अभिषेक आपल्या पोस्टमध्ये म्हणतो, ‘सर पूर्ण आदर ठेवून सांगतो, मला वाटत नाही ते (पाकिस्तानी खेळाडू) असे करू शकतील. आणि तसेही मी क्रिकेट खेळत नाही.’

यावर नेटीझन्सनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. एकजण म्हणतो, ‘अभिषेकने पिचवर पाय न ठेवताही शोएब अख्तरला क्लीन बोल्ड केले आहे.’ तर दूसरा म्हणतो 'सिक्सर मारण्यासाठी त्यांना क्रिकेट खेळण्याची अजिबात गरज नाहीये. त्यांच्या पोस्टच पुरेशा आहेत.’ तर एकाने थेट शोएबच्या वयावर कमेंट केली आहे. होते असे वय झाले की असेच होते. बच्चन आणि शर्मामधला फरक समजत नाही आणि याला खेळायचे आहे.’

41 वर्षांनंतर पहिल्यांदाच पाकिस्तान आणि भारत आमने सामने

1984 मध्ये आशिया कपची सुरुवात झाली. भारताने आतापर्यंत आठ वेळा आशिया कप आपल्या नावावर केला आहे..

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT