Shilpa Shirodkar education and her death rumored
मुंबई - अभिनेत्री शिल्पा शिरोडकरचे नाव खूप चर्चेत आहे. एकेकाळी तिच्या मृत्यूची अफवा कशी पसरली होती आणि सेटवर काय काय घडले? याबद्दल खुलासा केला आहे. एकदा शिल्पाची गोळी झाडून हत्या असे वृत्त पसरले होते, ज्यामुळे तिचे कुटुंबीय खूप चिंतेत होते. हा किस्सा शिल्पा शिरोडकरने सांगितला आहे. सोबतच तुम्हाला माहिती आहे का, शिल्पा १० वीमध्ये नापास झाली होती. पण तिच्या पतीने उच्च शिक्षण घेतले आहे. जाणून घेऊया त्यांच्या विषयी..
२००० मध्ये शिल्पा शिरोडकरने अपरेश रंजीत यांच्यासोबत लग्न केले. त्यानंतर ती अभिनयापासून दूर गेली. मुंबई सोडली आणि अपरेशसोबत न्युझीलँडला सेटल झाली होती. तिने एका वेबसाईटला माहिती दिली की, देशाबाहेर जाण्याचा निर्णय तिने स्वत: घेतला होता. ती म्हणाली, माझे पती एक बँकर आहेत आणि त्यांच्याकडे डबल एमबीएची पदवी आहे. एकीकडे मी १० वी नापास आहे. लग्नानंतर माझ्या शिक्षणावरून मला लाज वाटायची. पण ते खऱ्या आयुष्यात एक साधे व्यक्ती आहेत. त्यांच्यासोबत आयुष्य काढणे माझ्यासाठी एक नवं जीवन होतं. मला खंत आहे की, त्यावेळी मी मुंबई सोडली होती. जर लग्न भारतात झालं असतं तर कदाचित मी माझं काम पुढे सुरु ठेवलं असतं.
शिल्पाला एक मुलगी अनुष्का आहे. शिल्पा शिरोडकर ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. चित्रपटांपासून दूर गेलेली शिल्पा दीर्घकाळानंतर बिग बॉस सीजन- १८ या शो च्या माध्यमातून वापसी केली होती.
१९९५ मध्ये जेव्हा शिल्पा शिरोडकर 'रघुवीर' चित्रपटाचे शूटिंग करत होती, तेव्हा बातमी पसरली की, गोळी लागून तिचा मृत्यू झाला आहे. या वृत्तानंतर तिच्या घरी कुटुंबीय चिंतेत होते. नंतर निर्मात्यांनी हे देखील सांगितलं की, हा चित्रपटासाठी प्रचार करण्याची एक पद्धत होती. जेव्हा तिला हे कळलं तेव्हा ती म्हणाली, 'ठिक आहे...पण हे जरा अधिकच झालं आहे.'
शिल्पा शिरोडकर म्हणाली, त्यावेळी 'मी कुल्लू मनालीमध्ये होते. माझे वडील हॉटेलमध्ये फोन करण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी माझ्याकडे मोबाईल फोन नव्हता. मी तिथे सुनील शेट्टी सोबत शूटिंग करत होते. तिथे शूटिंग पाहणारे सर्व लोक हे पाहून विचार करत होते की, ही शिल्पा आहे की आणखी कुणी? कारण त्यांना मृत्यूची बातमी माहिती होती.'
शिल्पा पुढे म्हणाली, 'जेव्हा मी खोलीत परतले तेव्हा जवळपास २०-२५ मिस्ड कॉल पडले होते. माझे आई-वडील चिंतेत होते. वृत्तपत्रात हेडलाईन छापली होती-'शिल्पा शिरोडकर की गोली मारकर हत्या कर दी गई है.'
शिल्पा म्हणाली,' त्याकाळात पीआर वगैरे काही नव्हते. मी चित्रपट चांगला चालला. त्यामुळे मी खूप नाराज नव्हते.'