मनोरंजन

दिग्दर्शक शेखर कपूर यांनी सांगितला मासूम चित्रपटाचा तो खास किस्सा

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : शेखर कपूर हे दूरदर्शी चित्रपट निर्माते म्हणून ओळखले जातात त्यांनी चित्रपट निर्मिती च्या सोबतीने दिग्दर्शनात पदार्पण केलं आणि मासूम या सुपरहिट चित्रपटातून ते प्रसिद्धीच्या झोतात आले. अलीकडेच त्याने खुलासा केला की मासूम हा चित्रपट सृष्टीतील त्याचा पहिला प्रवेश होता. कोणताही अनुभव किंवा औपचारिक प्रशिक्षण नसताना हा चित्रपट तयार झाला.

त्यांनी नुकतेच ट्विट देखील केले आहे की, "#मासूम हा माझा पहिला चित्रपट होता. मी चित्रपटनिर्मिती शिकत नसताना सहाय्य केले नव्हते. मी चित्रपट पूर्णपणे अंतर्ज्ञानाने बनवला होता.फक्त खात्री करून घेतली की मी जमेल तितक्या भावनिकपणे कथा सांगत आहे. अभिनेत्यांकडून माझ्या टीमकडून आणि गुलजार आणि आरडी बर्मन यांच्याकडून यासाठी खूप पाठिंबा मिळाला."

त्यांना IGF च्या UK-India ॲवॉर्ड्समध्ये "UK-India Relations मध्ये जीवनभर योगदान" पुरस्कार सन्मानित करण्यात आले. कपूर यांच्या " what's love got to do with it ? " सिनेमाने यूके मधील राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये ९ पुरस्कार नामांकन मिळाले आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट चित्रपटासह ४ पुरस्कार जिंकले.  शेखर कपूर सध्या 'मासूम: द नेक्स्ट जनरेशन' वर काम करत आहेत.

SCROLL FOR NEXT