पुढारी ऑनलाईन डेस्क : सनी एका नव्या तमिळ चित्रपटात दिसणार आहे. (Quotation Gang ) "कोटेशन गँग" या तमिळ चित्रपटात ती दिसणार असल्याची घोषणा तिने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमधून केली. सोशल मीडिया वर चित्रपटाचा टीझरसह तिने ही खास गोष्ट तिच्या फॅन्ससोबत शेअर केली. (Quotation Gang )
सनीने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमधून तिच्या नवीन तमिळ चित्रपट कोटेशन गँगचा टीझर पोस्ट केला. "कोटेशन गँग तामिळचा टीझर आता आऊट!! " अशी कॅप्शन लिहून तिने ही गोष्ट शेयर केली आहे.
केनेडीच्या रिलीजसाठी उत्साह वाढत असताना सनीने तिच्या आगामी तमिळ चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. आता प्रेक्षकांना या दोन्ही प्रोजेक्ट्सबद्दल उत्सुकता आहे यात शंका नाही.