Shefali Jariwala in podcast reveal about kaanta laga song  Instagram
मनोरंजन

Shefali Jariwala sudden death | 'कांटा लगा गर्ल' शेफाली १० महिन्यांपूर्वीच म्हणाली होती, 'मला मरेपर्यंत...'

Shefali Jariwala Podcast reveal |एका पॉडकास्टवर संभाषणादरम्यान, तिला विचारले की, तिला कधी कांटा लगासाठी ओळखले जाण्याचा कंटाळा आला आहे का?

स्वालिया न. शिकलगार

एका पॉडकास्टवर बातचीतवेळी तिला विचारण्यात आले होते की, काँटा लगा साठी ओळखल्या जाण्याचा कंटाळा कधी आला आहे का? त्यावर तिने सुंदर उत्तर दिलं होतं.

I want to be known as the Kaanta Laga girl till the day I die-Shefali

मुंबई - काँटा लगा गर्ल शेफाली जरीवालाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तिच्या अचानक जाण्याने कलाविश्वात शोककळा पसरली आहे. फॅन्स सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहत आहेत. तिच्या जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

अभिनेत्री आणि रिअॅलिटी टीव्ही व्यक्तिमत्व असलेली शेफाली जरीवालाला 'कांटा लगा गर्ल' म्हणून प्रेमाने आठवले जाते. पण तिने वयाच्या ४२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्रीला २७ जूनच्या रात्री उशिरा हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त समोर आले.

वृत्तानुसार, शेफालीला तिच्या पती आणि इतर तिघांनी तातडीने मुंबईतील अंधेरी येथील बेलेव्ह्यू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र, पोहोचताच तिला मृत घोषित केले. रुग्णालयाच्या रिसेप्शनिस्टने या दुःखद बातमीला दुजोरा देत म्हटले की, "शेफालीला आणण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. तिचा पती आणि काही इतर लोक तिच्यासोबत होते."

शेफाली म्हणाली होती, 'मला मरेपर्यंत..'

फक्त १० महिन्यांपूर्वी, शेफालीने तिने डेब्यू केलेल्या म्युझिक व्हिडिओसंदर्भात चर्चा झाली होती. एका पॉडकास्टवर संभाषणादरम्यान, तिला विचारले की, तिला कधी कांटा लगासाठी ओळखले जाण्याचा कंटाळा आला आहे का? यावर शेफाली जरीवाला म्हणाली होती, "मला मरेपर्यंत काँटा लगा गर्ल म्हणून ओळखले जायचे आहे".

ती पुढे म्हणाली-"पण तुम्ही मला सांगा, एक कलाकार केवळ ओळख निर्माण करण्यासाठी किती मेहनत करतात? जसे अँग्री यंग मॅन वा किंग खान. माझ्या पहिल्या प्रोजेक्टमध्ये, मला ओखळ मिळाली. संपूर्ण जागत केवळ एकच कांटा लगा मुलगी असू शकते आणि ती मी आहे. मला ते खूप आवडतं. मला मरेपर्यंत कांटा लगा गर्ल नावाने ओळखले जायचे आहे. इतकचं नाही तर धरतीवर शेवटच्या क्षणी देखील, मला हेच वाटतं की, लोक मला त्याच नावाने आठवतील. याचा मला अभिमान आहे." कांटा लगा गाणे १९७१ मध्ये आलेला समाधी चित्रपटातील होते. तेच गाणे पुढे २००२ मध्ये रिमिक्स करण्यात आले, ज्यामध्ये शेफालीने काम केले होते. हे रिमिक्स लोकांच्या पसंतीसही उतरले होते.

कांटा लगाची कॅसेट खरेदी करण्यास आईने केलेली मनाई

पॉडकास्टमध्ये तिने एक किस्सा सांगितला होता. तिने म्हटलेलं की, ''कशाप्रकारे तिच्या आईने कांटा लगा कॅसेट खरेदी करण्यास मनाई केली होती आणि तिचे ओरडणे खावे लागले होते. कव्हरवर शेफालीचा फोटो पाहून आई हैराण होती. तिने हसत सांगितले होते की, “माझा पोशाख संपूर्ण शरीर झाकले जाईल असे होतेय मी कदाचित रीमिक्सच्या त्या युगातील सर्वाधिक कपडे घालण्याऱ्या मुलींपैकी एक होते.''

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT