Mumbai Police Investigation after Shefali Jariwala death
मुंबई - अभिनेत्री शेफाली जरीवालाचे वयाच्या ४२ व्या वर्षी निधन झालं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, २७ जूनच्या रात्री तिला कार्डियक ॲरेस्ट आला होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. शेफाली जरीवालाच्या घरी फॉरेन्सिक टीम पोहोचली. अंबोली पोलिस स्टेशनमध्ये घरातील नोकर आणि कुकची चौकशी केली जात आहे. तसेच नातेवाईकांचाही जबाब नोंदवला जात आहे.
मुंबई पोलिस अधिकाऱ्यांनी शेफाली जरीवालाचा पती पराग त्यागीचा जबाब त्याच्या घरी नोंदवला. आतापर्यंत चार जणांचे जबाब नोंदवले गेले आहेत. पोलिसांना काहीही संशयास्पद आढळलेले नाही. यापूर्वी, पोलिसांनी माध्यमांना सांगितले की, तिच्या मृत्यूमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही आणि ते अद्याप या प्रकरणाचा तपास करत आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, शेफालीला बेशुद्धावस्थेत घेऊन पती पराग त्यागी, आणि अन्य तीन लोकांसमवेत शुक्रवारी रात्री मुंबईतील अंधेरी स्थित बेलेव्यू रुग्णालयात पोहोचले होते. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले होते. आता तिचे शव पोस्टमार्टमसाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
शेफालीने २००८ मध्ये बूगी-वूगी, २०१२-२०१३ मध्ये नच बलिए ५, २०१५-२०१६ मध्ये नच बलिए ७ आणि बिग बॉस १३ (२०१९-२०२०) मध्ये ती दिसली होती. २०२४ मध्ये शैतानी रस्मे चित्रपटात ती दिसली होती.