Shahrukh Khan gave Mai Hoon Na Iconic pose at Meta Gala 2025  X account
मनोरंजन

Met Gala 2025 | शाहरुखची ग्रँड एन्ट्री, पण कोणी ओळखलचं नाही; सोशल मीडियावर संताप

Met Gala 2025 Shah Rukh Khan | 'मेट गाला'मध्ये शाहरुखसोबत एक विचित्र प्रसंग घडला. त्यामुळे चाहत्यांमध्ये रोष आहे.

स्वालिया न. शिकलगार

संयमी शाहरुख खानने परदेशी मीडियाला शांतपणे उत्तर दिले. विचारण्यात आलेल्या प्रश्नांना शाहरुखने संयमी प्रतिक्रिया दिल्या. परंतु, फॅन्सनी मात्र रोष व्यक्त केलाय. 'मेट गाला'मध्ये शाहरुख सोबत घडलेल्या विचित्र प्रकारानंतर परदेशी मीडियाचे अज्ञान दिसून येते, अशा कॉमेंट्स अनेकजण देताना दिसताहेत.

Met Gala debut in 2025 Shah Rukh Khans Fans angry

न्यू-यॉर्क : बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानने यावर्षी 'मेट गाला'मध्ये डेब्यू केलं आहे. सब्यसाची मुखर्जीने डिझाईन केलेल्या आऊटफिटमध्ये तो रेड कार्पेटवर वॉक करताना दिसला. दरम्यान, असं काही घडलं की, शाहरुखच्या चाहत्यांमध्ये रोष निर्माण झालाय. मेट गाला सोहळ्यातून शाहरुखचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो स्वत:ची ओळख करून देताना दिसतोय.

यावर्षी काही भारतीय स्टार्सनी पहिल्यांदाच 'मेट गाला'च्या रेड कार्पेटवर डेब्यू केलं आहे. शाहरुख खानसोबत कियारा आडवाणी, प्रियांका चोप्रा, दिलजीत दोसांझ सारखे प्रसिद्ध स्टार्स देखील ससोहळ्यात सहभागी झालेत. त्यांचे लूक्स, फोटोज, व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

मेट गाला २०२५ मध्ये शाहरुख खानची ग्रँड एन्ट्री

मेट गालामध्ये शाहरुख खानने आयकॉनिक फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जीच्या आऊटफिटला निवडलं होतं. यावेळी त्याने तस्मानियाई सुपरफाईन लांबलचक कोट घातला होता. त्यावर जपानी हॉर्नची बटणे जोडलेली होती. बंगाल टायगर चेन हिऱ्यांसोबत १८ कॅरेट सोन्या मध्ये तयार करण्यात आली होती. त्याने गळ्यात ‘K’ नेकलेस देखील घातला होता.

video - SRK_x10  Lady Rathore  x account वरून साभार

शाहरुख खानला कुणीच कसे ओळखले नाही?

शाहरुखचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये ‘किंग खान' परदेशी मीडियाशी बोलताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये मीडिया काहीतरी विचारताना दिसत आहे. त्यानंतर तो आपला गॉगल ठिक करताना दिसतो आणि स्वत:ची ओळख करून देताना म्हणतो - 'आय एम शाहरुख.' त्यानंतर मीडिया त्याला त्याच्या लूक विषयी विचारते. तेव्हा तो सबस्याचीने डिझाईन केलेला आऊटफिट असल्याचे सांगतो.

Shahrukh Khan at Meta Gala 2025

सोशल मीडियावर फॅन्सचा संताप

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून युजर्सनी संताप व्यक्त केला आहे. हा व्हिडिओ पाहून फॅन्सना आश्चर्य वाटले. शाहरुखचे ग्लोबल स्टारडम आहे आणि तरीदेखील त्याला स्वत:ची ओळख करून द्यावी लागत आहे. या विचित्र प्रकारानंतर फॅन्समध्ये रोष आहे. अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या असून एकाने म्हटलंय - २०२५ च्या मेट गालामध्ये शाहरुखचे पहिले पाऊल असले तरी आश्चर्यकारकपणे काही परदेशी माध्यमांकडून त्याला अनादर वाटला असावा. मुलाखत घेणाऱ्यांना खानच्या जागतिक स्टारडमची जाणीव नव्हती, असेही एकाने म्हटले आहे. दुसऱ्या युजरने म्हटलंय- माध्यमांच्या तयारीचा अभाव असूनही खानने आपला संयम ठेवला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT