Superstar Shah Rukh Khan Film King First Look Out:
बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान आज आपला 60वा वाढदिवस साजरा करत आहे. देशभरातील आणि जगभरातील चाहत्यांसाठी हा दिवस म्हणजे उत्सवच. ‘किंग खान’चा चार्म, त्याची स्टाईल आणि त्याच्या अॅक्टिंगची जादू अजूनही कायम आहे. आणि या खास दिवशी शाहरुखने चाहत्यांना एक जबरदस्त गिफ्ट दिलं आहे. त्याच्या पुढच्या अॅक्शन फिल्मचा फर्स्ट लुक आज रिलीज केला आहे.
रेड चिलीज एंटरटेनमेंटने सकाळीच हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. “सौ देशों में बदनाम, दुनिया ने दिया सिर्फ एक ही नाम- किंग!” असा दमदार डायलॉग असलेला 1 मिनिट 11 सेकंदांचा हा व्हिडिओ पूर्णपणे शाहरुखच्या करिष्म्यानं भरलेला आहे. ग्रे शेडचे केस, स्टायलिश चष्मा आणि अॅक्शन मोडमधला शाहरुख, स्क्रीनवरून नजर हटवणं अवघडच!
व्हिडिओ शेअर करताना रेड चिलीजच्या टीमने लिहिलं, “इट्स शो टाइम! किंग 2026मध्ये थिएटरमध्ये!” म्हणजेच चित्रपटाची रिलीज डेट अद्याप स्पष्ट नाही, पण हे नक्की की ‘किंग’ 2026 मध्ये प्रेक्षकांसमोर येणार आहे.
गेल्या काही वर्षांत शाहरुखच्या कारकिर्दीमध्ये अनेक चढ-उतार आले. काही चित्रपटांनी अपेक्षित कमाई केली नाही, पण 2023 हे वर्ष त्याच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरलं. ‘पठाण’ आणि ‘जवान’ या दोन्ही चित्रपटांनी तब्बल 1,000 कोटींच्या कमाईचा टप्पा पार केला. ‘डंकी’नेही जवळपास 500 कोटींचं कलेक्शन करत बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली.
2024 आणि 2025 मध्ये शाहरुखचा एकही चित्रपट रिलीज झाला नाही. मात्र, आपल्या 60व्या वाढदिवशी शाहरुखने पुन्हा एकदा चाहत्यांना आश्वासन दिलं आहे. ‘किंग’ सह तो पुन्हा एकदा थिएटरमध्ये पुनरागमन करणार आहे. या चित्रपटात त्याची मुलगी सुहाना खानही झळकणार असून शूटिंग सध्या सुरू आहे.
चाहत्यांमध्ये आधीच उत्साह आहे. सोशल मीडियावर “King Is Back” हा हॅशटॅग ट्रेंड होत असून सर्वत्र पुन्हा एकदा शाहरुखचा दबदबा जाणवतोय.