Sara Tendulkar Post pudhari
मनोरंजन

Sara Tendulkar Post : ताहीर हे किळसवाणं आहे... सारा 'त्या' फोटोवरून जाम भडकली, म्हणाली ही पत्रकारिता नाही

Anirudha Sankpal

Sara Tendulkar Post : सचिन तेंडुलकरची मुलगी आणि मॉडेल सारा तेंडुलकर ही सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. सारा सहसा तिची आई अंजली तेंडुलकर यांच्यासोबत सार्वजनिक ठिकाणी नेहमी दिसते. त्यावेळी या दोघी माया लेकी पापारात्झींच्या गराड्यातच असतात. साराच्या पोस्ट आणि फोटोंवर सोशल मीडियावर चांगल्या लाईक्स आणि कमेंट्स येत असतात.

साराचं ट्रोलिंग

मात्र साराबद्दल काही लोकं ट्रोलिंग देखील करत असतात. नुकताच साराच्या बाबतीत असाच एक प्रकार झाला. एका ताहीर नावाच्या कथित पत्रकाराने साराचे बॉडी शेमिंग करण्याचा प्रयत्न केला. साराने या अशा घटनेकडे दुर्लक्ष न करत त्या संबंधित कथित पत्रकाराला चांगलेच झापले. याबाबतची पोस्ट साराने आपल्या सोशल मीडिया स्टोरीवर ठेवली आहे.

साराचे कडक प्रत्युत्तर

सारा आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर स्वतःचा आणि आई अंजली तेंडुलकर यांचा विमानतळावर चेक इन करतानाचा फोटो शेअर केला. या फोटोला कथित पत्रकार ताहीर जासूसने आक्षेपार्ह कमेंट केली होती. सारा त्या ताहीरला उद्येशून आपल्या पोस्टमध्ये म्हणते, 'ताहीर हे खूप किळसवाणं आहे. ही काही पत्रकारिता नाही. आम्हाला एकटे सोडा. तू तुझी पोस्ट डिलीट करू शकतोस मात्र तरीसुद्धा तू किळसवाणाच आहेस.'

आता बुरखा फाडण्यावर भर

साराच्या या पोस्टनंतर ट्रोलिंग आणि आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा त्यांचा खरा चेहरा सर्वांसमोर आणण्यास आता सेलिब्रेटी प्राधान्य देत आहेत असं दिसत आहे. अनेक महिला सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अशाच प्रकारे जे कोणी घाणेरड्या कमेंट करत आहेत त्यांचा बुरखा फाडत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT