Sara Ali Khan desert vacation photos
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि त्यांचा लहान भाऊ इब्राहिम अली खान यांनी नुकतीच सौदी अरबमध्ये सुट्टी साजरी केली आहे. दोघांनीही क्वालिटी टाईम स्पेंड केला. त्यांच्या प्रवासाचे काही क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यांच्या या ट्रॅव्हलच्या फोटोंवर तुफान कॉमेंट्सही पडले आहेत. या सुट्टीमध्ये सारा-इब्राहिम यांनी एकमेकांसोबत वेळ घालवला. निसर्गरम्य वातावरणात फोटोसेशन केले आणि साराने आपल्या भावासोबत फोटो क्लिक केले आहेत.
हे फोटो इब्राहिम अली खानने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. फोटोंमध्ये दोघेही निवांत शेकोटी जवळ बसलेले दिसतात. सारा अली खान - इब्राहिम अली खान नुकताच सौदी अरबचे ऐतिहासिक शहर अल-उलामध्ये एका सुंदर व्हेकेशनवर गेले होते. सोनेरी वाळू, शांत वातावरणात दोघांनी प्रवासाचा आनंद घेतला.
साराने रात्री चांदण्यांच्या प्रकाशातील एक झलक दाखवली. अल-उलातील शांत शहराची झलक तिने कॅमेराबद्ध केली. याआधी इब्राहिमला वडाच्या झाडाखाली अल-उलाच्या इन्फिनिटी पुलाकिनारी आराम करताना पाहण्यात आलं होतं. सारा-इब्राहिमच्या या ट्रॅव्हल फोटोजनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. शांत वाळवंटातील रात्र ते उन्हाने चमकणाऱ्या पुलापर्यंत बहिण-भाऊ सारा-इब्राहिमने आपल्या प्रवासाचे स्वप्न पूर्ण केले.
अल-उला प्रसिद्ध का आहे?
अल-उला आपल्या शानदार वाळवंटातील दृश्ये, लक्झरी रिसॉर्ट्स, ऐतिहासिक स्थळे आणि वातावरण सर्वांना आकर्षित करणारे आहे.