Shivaji Raje Bhosale movie : शिवाजी राजे भोसले चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा!

स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार
Shivaji Raje Bhosale movie
Shivaji Raje Bhosale moviepudhari photo
Published on
Updated on

मुंबई : कॉपीराईटचे उल्लंघन केल्याचा आरोपामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या शिवाजी राजे भोसले चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. स्थगितीची मागणी करणाऱ्या एव्हरेस्ट इंटरटेन्मेंट एलएलपीला दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. न्यायमूर्ती अमित जामसंडेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज ही एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख आहे जी कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेची मक्तेदारी असू शकत नाही असे अशा शब्दात याचिकाकर्त्यांना फटकारत स्थगितीची मागणी फेटाळून लावली.

2009 साली महेश मांजरेकर यांच्या अश्वमी फिल्म्ससोबत मी शिवाजी राजे भोसले बोलतोय या चित्रपटाची सहनिर्मिती करणाऱ्या एव्हरेस्ट एंटरटेनमेंटने आधीच्या चित्रपटाच्या शीर्षक आणि पटकथेवर विशेष कॉपीराइट असल्याचा दावा केला होता.

Shivaji Raje Bhosale movie
Shahrukh Khan: तुझा तर चेहरा पण चांगला नाही स्टार कसा बनला? विचारणाऱ्या फॅनला शाहरुखचे तिखट उत्तर चर्चेत

2013 साली, कंपनीने चित्रपटाचे पूर्ण हक्क मिळवले आणि नंतर महेश मांजरेकर हे त्याचा सिक्वेल काढणार असल्याचे दिसून आले. कंपनीने आरोप केला आहे की पुन्हा शिवाजी राजे भोसले चित्रपटासाठी पटकथा, कथानकाची रचना आणि संवादांचे बरेच भाग कॉपी केले आहेत. या याचिकेवर सुटीकालीन न्यायालयाचे न्यायमूर्ती अमित जामसंडेकर यांच्या समोर सुनावणी झाली.

Shivaji Raje Bhosale movie
Actor Yash | टॉक्सिक: ए फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स रिलीज डेटमध्ये बदल? जाणून घ्या लेटेस्ट अपडेट

महेश मांजरेकर यांनी चित्रपटासाठी पूर्णपणे नव्याने काम केले असून एव्हरेस्टच्या चित्रपटाचे त्यात अनुकरण दिसत नाही. त्यामुळे या दाव्यात कोणतेही तथ्य नाही, असे कोर्टाने स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news