Samantha Ruth Prabhu  pudhari
मनोरंजन

Samantha Ruth Prabhu : सामंथा रूथ प्रभूला पुत्ररत्न... सोशल मीडियावरून केली घोषणा; मुलाच्या नावाची जोरदार चर्चा

पोस्टमध्ये सामंथाने आपल्या मुलाचे नाव देखील उघड केलं असून या पोस्टवर बॉलीवूडपासून दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील अनेकांनी अभिनंदनाचे मेसेज केले आहेत.

Anirudha Sankpal

Samantha Ruth Prabhu Son Name : सामंथा रूथ प्रभू आणि राज निरदिमोरू यांच्या घरी पाळणा हलला आहे. अभिनेत्रीने आपल्या घरात तान्ह्या बाळाची पावले उमटणार असल्याचं इन्स्टाग्रामवर पोस्ट करून सांगितलं. यावेळी तिने या आनंदाच्या प्रसंगी एक खास फोटो देखील शेअर केला आहे. या पोस्टमध्ये सामंथाने आपल्या मुलाचे नाव देखील उघड केलं असून या पोस्टवर बॉलीवूडपासून दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील अनेकांनी अभिनंदनाचे मेसेज केले आहेत.

सामंथाची इन्स्टा पोस्ट

सामंथाने आपल्या इन्स्टा अकाऊंटवरून फोटो शेअर केला आहे त्यात मुलाचा हात दिसत आहे. मुलाने आपल्या वडिलांचा हात पकडला असून आईने त्या मुलाचा हात हातात घेतला आहे. या फोटोला सामंथाने कॅप्शन दिलं आहे. 'आमचा प्रेमळ बेबी बॉय देव निदिमोरू. १९.११.२०२६ आज आमचच्या एवढं आमचं ह्रदय आनंदाने एवढं कधी भरलं नव्हतं.'

अनेकांनी केलं अभिनंदन

सामंथा रूथ प्रभूच्या या पोस्टवर तमन्ना भाटियाने हार्टचा इमोजी शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. तर वरून धवनने देखील अभिनेत्रीचे अभिनंदन केलं आहे. सामंथा फॅन क्लब पेजने लिहिलं की तुमचा छोटासा राजकुमार आला आहे. प्रेमाचा अजून एक चाप्टर सुरू झाला आहे. सॅम आणि राजचे अभिनंदन.

सामंथा रूथ प्रभ

सामंथा रूथ प्रभूने जून २०२६ मध्ये आपला चित्रपट मा इंटी बंगारमच्या यशानंतर सेलिब्रेशन करताना आपण गरोदर असल्याचं घोषित केलं होतं. मुलाच्या जन्माआधीत सामंथाने घरात एक खास पूजा ठेवली होती. सामंथाने या पूजेचे फोटो आपल्या इन्स्टाग्रामवरून शेअऱ केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT