नागा चैतन्यशी घटस्फोटानंतर सामंथा रुथ प्रभूची नवी इनिंग सुरु झालीय, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सध्या ती एखा फोटोमुळे चर्चेत आलीय. फोटोमध्ये दिग्दर्शक राज निदिमोरू दिसत आहे. सामंथाने सोशल मीडियावर हा फोटो पोस्ट केला आहे.
Samantha Ruth Prabhu Dating with Director Raj Nidimoru
मुंबई : सामंथा रूथ प्रभू सध्या 'सुभम' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. निर्माती म्हणून या चित्रपटाद्वारे ती पदार्पण करतेय. सुभम चित्रपट अद्याप रिलीज व्हायचा आहे. त्यापूर्वी, तिने सोशल मीडियावर प्रमोशनल फोटो, क्रू स्नॅप्स आणि दिग्दर्शक राज निदिमोरूसोबतचा एक फोटो असे फोटोज शेअर केला आहे. यावरूनच सामंथा आणि राज यांची चर्चा होताना दिसत आहे.
सामंथा आणि राज यांनी द फॅमिली मॅन आणि सिटाडेल, हनी बनी सारख्या प्रोजेक्टमध्ये एकत्र काम केले आहे. आता फॅन्स दोघांमधील नात्याची चर्चा करत आहेत. पण, अद्याप दोघांकडून या विषयावर कोणतीही पुष्टी झालेली नाही. दिग्दर्शक राज यांचे लग्न श्यामली डे सोबत झाले आहे आणि त्यांना एक मुलगी असल्याचे म्हटले जात आहे. अभिनेत्री समांथा रूथ प्रभूने अभिनेता नागा चैतन्यशी चार वर्षांचे वैवाहिक जीवन संपुष्टात आणले.
सामंथा आणि डायरेक्टर राज निदिमोरु यांच्या अफेअरची अफवा काही दिवसांपूर्वी उडाली होती. दरम्यान, सामंथाने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर राज सोबतचे काही फोटो पोस्ट केले. फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिलं, 'नवीन सुरुवात'. @traralalamovingpictures. #Subham ९ मे रोजी रिलीज होतोय.'
सामंथाच्या या इन्स्टाग्राम पोस्टनंतर नेटिजन्सनी तिच्या रिलेशनशिपवरून तर्क लढवण्यास सुरुवात केली. सामंथाचा पहिला चित्रपट 'सुभम' ९ मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा हॉरर-कॉमेडी चित्रपट आहे.
राज निदिमोरु एक दाक्षिणात्य दिग्दर्शक आहे. त्याला एक मुलगी आहे. आता ती लवकरच राजचा चित्रपट 'सुभम'मध्ये दिसणार आहे. इतकचं नाही तर दोघांना पिकलबॉल टीम चेन्नई सुपर चॅम्प्समध्ये एकत्र पाहण्यात आलं होतं. त्यानंतर दोघांच्या अफेअरची चर्चा सुरु झाली.