Salman Khan Moves Delhi High Court over Kala Hiran: Battle for Legacy film pudhari photo
मनोरंजन

Salman Khan Moves Delhi High Court | 'काला हिरण- द बॅटल फॉर लेगेसी' विरोधात सलमान खान उच्च न्यायालयात! टीजरसह प्रदर्शन थांबवण्याची मागणी

Kala Hiran: Battle for Legacy film- 'काला हिरण' विरोधात सलमान खानने उच्च न्यायालयात धाव घेतली, प्रतिष्ठा खराब झाल्याचा आरोप

स्वालिया न. शिकलगार

'काला हिरण - द बॅटल फॉर लेगेसी' या चित्रपटावरून नवा वाद निर्माण झाला आहे. अभिनेता Salman Khan यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करत चित्रपटाचा टीजर आणि प्रदर्शन रोखण्याची मागणी केली आहे. चित्रपटामुळे आपल्या प्रतिमेला धक्का पोहोचू शकतो, असा दावा त्यांनी केल्याची चर्चा आहे. या प्रकरणाकडे आता बॉलिवूडसह चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

'काला हिरण-बॅटल फॉर लेगसी' चित्रपटाविरोधात सलमान खानने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तो म्हणतो की, चित्रपट आणि त्याच्या जाहिरातींमुळे चालू कामकाजावर परिणाम होऊ शकतो आणि त्याची प्रतिष्ठा खराब होऊ शकते.

वादग्रस्त चित्रपट 'काला हिरण- द बॅटल फॉर लेगेसी'चे फर्स्ट लुक आज शुक्रवार जारी झाले आहे. हा चित्रपट रिलीज आधी वादात सापडला आहे. सलमान खानने निर्मात्यांना कायदेशीर नोटीस आधीच बजावली आहे. दरम्यान, निर्मात्यांनी फर्स्ट लूक प्रदर्शित केला. आता, दबंग खानने चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याने चित्रपटाच्या रिलीजवर स्थगितीची मागणी केली आहे.

सलमान खानच्या काळवीट प्रकरणाशी संबंधित काला हिरण-द बॅटल ऑफ लेगेसी चित्रपट येणार आहे. त्यामुळे सलमानखानने यावर स्थगिती आणण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. तसेच टीजर आणि प्रदर्शनावर स्थगिती आणण्याची मागणी केली आहे.

सलमानने केली ही मागणी

चित्रपट 'काला हिरण'च्या आज प्रदर्शित करण्यात आलेल्या फर्स्ट लुकमध्ये मुख्य भूमिकेचे नाव देखील सलमान खानशी मिळतेजुळते आहे. लूक देखील अभिनेत्यासारखा आहे. त्या पात्राने सलमान खानसारखेच ब्रेसलेट घातले आहे. दरम्यान, याविरोधात सलमान खान दिल्ली उच्च न्यायालयात पोहोचला.

एका वृत्तसंस्थेनुसार, सलमान खानने 'काला हिरण: द बॅटल फॉर लेगसी' नावाच्या प्रस्तावित चित्रपटाच्या निर्मात्यांविरुद्ध अंतरिम दिलासा मिळवण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

सलमान खानने काय आरोप केले?

सलमान खानचा आरोप आहे की, हा प्रोजेक्ट त्याच्या व्यक्तिमत्व हक्कांचा बेकायदेशीरपणे वापर करत आहे आणि त्यामुळे त्याच्या प्रतिष्ठेवर तसेच १९९८ च्या काळवीट शिकार प्रकरणाशी संबंधित सुरू असलेल्या कायदेशीर कार्यवाहीवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT