Cinema Maatrubhumi song behind seen shooting video viral  instagram
मनोरंजन

Cinema Maatrubhumi |सेटवर वैभवी मर्चंटच्या तालावर नाचला सलमान! 'चांद देख लेना'साठी भाईजानची इतकी मेहनत; पाहा पडद्यामागचा 'तो' व्हिडिओ

वैभवी मर्चंटच्या तालावर सलमान-चित्रांगदाचा डान्स! 'मातृभूमी' चित्रपटातील गाण्याचं शूटिंग कसं झालं? पाहा मेकिंगची झलक

स्वालिया न. शिकलगार

सलमान खान फिल्म्स संगीतने नुकताच 'चांद देख लेना' या गाण्याचा मेकिंग व्हिडिओ प्रदर्शित केला आहे, ज्याने सोशल मीडियावर प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. 'मातृभूमी' या आगामी चित्रपटातील हे गाणे सलमान खान आणि चित्रांगदा सिंह यांच्यातील सुंदर केमिस्ट्रीमुळे आधीच गाजत आहे. या मेकिंग व्हिडिओमध्ये नृत्यदिग्दर्शक वैभवी मर्चंट कशा प्रकारे या दोघांना डान्स स्टेप्स शिकवत आहेत. हिमेश रेशमियाने संगीतबद्ध केलेले हे गाणे सध्या युट्युबवर ट्रेंडिंग आहे.

बॉलिवूडचा 'भाईजान' सलमान खान जेव्हा जेव्हा पडद्यावर येतो, तेव्हा तो काहीतरी नवीन धमाका करतोच. सध्या सलमान त्याच्या आगामी ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील ‘चांद देख लेना’ हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं असून, ते चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे. मात्र, आता या गाण्याच्या मेकिंगचा (Behind-the-scenes) एक विशेष व्हिडिओ समोर आला असून, त्यामध्ये सलमान आणि चित्रांगदा सिंह यांची ऑफ-स्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

सेटवरची धम्माल आणि डान्सची तयारी

व्हायरल झालेल्या मेकिंग व्हिडिओमध्ये हे गाणं चित्रित करताना किती बारकाईने काम करावे लागते, हे दिसत आहे. प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक वैभवी मर्चंट या व्हिडिओमध्ये सलमान आणि चित्रांगदाला डान्सच्या स्टेप्स समजावून सांगताना दिसत आहेत. सलमान खान आणि वैभवी मर्चंट यांचे नाते खूप जुने आहे. अनेक सुपरहिट गाणी त्यांनी एकत्र दिली आहेत.

सलमान-चित्रांगदाची फ्रेश केमिस्ट्री

या गाण्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे सलमान खान आणि चित्रांगदा सिंह यांची जोडी. या मेकिंग व्हिडिओमध्ये दोघेही एकमेकांसोबत हलके-फुलके हसणे, दृश्यांची तयारी करताना त्यांचे एकमेकांशी संवाद आणि मजेशीर किस्से या व्हिडिओतून समोर आले आहेत.

हम दिल दे चुके सनमची आठवण

चाहत्यांनी या मेकिंग व्हिडिओवर कमेंट्सचा पाऊसही पाडला आहे. सलमानचा या गाण्याचा एक पोस्टर व्हायरल झालाय, तो लूक पाहून जुन्या 'हम दिल दे चुके सनम'ची आठवण करून देणारा, असे नेचकऱ्यांनी म्हटलंय. 'मातृभूमी' हा चित्रपट शौर्य आणि त्यागाची कहाणी मांडणारा आहे. चांद देख लेना हे रोमँटिक गाणे चित्रपटातील एक बाजू मांडणारे आहे. हिमेश रेशमिया यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला निहाल ताउरो आणि अंकोना मुखर्जी या तरुण गायकांनी आपला आवाज दिला आहे.

अपूर्व लाखिया यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेला हा चित्रपट २०२६ मधील सर्वात मोठा रिलीज मानला जात आहे.‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ ही निर्मिती सलमा खान यांनी केली असून दिग्दर्शन अपूर्व लाखिया यांनी केले आहे. या चित्रपटात सलमान सोबत चित्रांगदा सिंह महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT