बॉलिवूड अभिनेता सलमान खानने आपला वाढदिवस पनवेल येथील फार्महाऊसवर मोठ्या उत्साहात साजरा केला. या खास सेलिब्रेशनसाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित होते. विशेष म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार MS धोनी देखील पत्नी साक्षीसह या पार्टीत सहभागी झाला. या सेलिब्रेशनचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Salman Khan Birthday Video Viral
बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानचा २७ डिसेंबर रोजी ६० वा वाढदिवस आहे. त्याने त्याच्या पनवेलच्या फार्महाऊसवर अनेक सेलिब्रिटींसाठी आमंत्रण दिलं. यावेळी टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने एन्ट्री करून सर्वांना सरप्राईज दिलं. यावेळी सोशल मीडियावर धोनीचे काही फोटोज आणि व्हिडिओज खूप व्हायरल होत आहेत.
MS धोनी पत्नी साक्षी धोनीसह सलमान खानच्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी झाला. धोनी आणि सलमान यांची मैत्री सर्वांनाच माहीत आहे आणि अनेक वेळा हे दोघे एकत्र दिसले आहेत. पनवेल फार्महाऊसवर पोहोचताच धोनीचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.
पत्नी साक्षी - मुलगी जीवाची हजेरी
एमएस धोनी पत्नी साक्षी, मुलगीजीवा सोबत पोहोचला. धोनीचा गाडीतून येतानाचा व्हिडिओ सध्या एक्स अकाऊंटवर व्हायरल होत आहे. सलमानने यावेळी छोटी पार्टी दिली होती, ज्यामध्ये परिवारातील लोक, जवळचे मित्र मंडळी आणि सेलेब्स होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा धोनी फार्महाऊसवरून परतताना पापराझींनी त्याच्या वाहनाला घेरलं. यावेळी तो खूप शांत दिसला. आणि विनम्रतेने फोटोग्राफर्सना रस्त्यातून बाजूला होण्याची विनंती केली. नंतर सलमान आणि धोनीचे फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले. ज्यामध्ये सलमान आपली सिग्नेचर ब्लॅक टी-शर्ट आणि डेनिममध्ये दिसला. धोनीने स्टायलिश 'टॅन जॅकेट' घातले होते.
पार्टीच्या काही दिवसांआधी सलमानचा मेहुणा अतुल अग्निहोत्रीने एक जुना फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये सलमान खान, एम.एस. धोनी, पंजाबी गायक एपी ढिल्लों चिखलाने माखलेले दिसत होते. तो फोटो सलमानच्या फार्महाऊस वर एक रोमांचक 'एटीव्ही राईड' नंतर घेतला होता.