Bigg Boss 18 चे कंटेस्टेंट फायनल होत असल्याचे वृत्त आहे Salma khan Instagram
मनोरंजन

सलमान खान घेऊन येतोय Bigg Boss 18; कंटेस्टेंट फायनल?

कधी सुरु होणार Bigg Boss 18? कंटेस्टेंट फायनल

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - अनिल कपूरचा शो बिग बॉस ओटीटी ३ संपुष्टात आल्यानंतर आता सलमान खानचा शो बिग बॉस १८ (Bigg Boss 18) कडे लक्ष लागले आहे. आता बिग बॉस १८ शोची लेटेस्ट अपडेट समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शो सप्टेंबरच्या अखेरीस वा ऑक्टोबरच्या सुरुवातीला सुरू होऊ शकतो.

Bigg Boss 18 ची अपडेट

सलमान खानचा शो बिग बॉस १८ लेटेस्ट अपडेट शो कलर्स टीव्हीवर एका रोमांचक सुरुवात करण्यासाठी तयार आहे. त्यानंतर सप्टेंबरच्या अखेरीस वा ऑक्टोबरच्या सुरुवातीला लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. असे म्हटले जात आहे की, शोसाठी अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींशी संपर्क करण्यात आला आहे. बिग बॉस १८ चा होस्ट म्हणून सलमान खानची वापसीवर अद्याप निर्मात्यांकडून कोणतीही पुष्टी झालेली नाही. तो सध्या आपला नवा चित्रपट सिकंदरच्या शूटिंगमध्ये बिझी आहे.

Bigg Boss 18 शो चे कन्फर्म झाले २ कंटेस्टेंट

दरम्यान, Bigg Boss 18 विषयी आणखी एक धमाका होणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. या शो च्या आधी कंटेस्टेंटची नावे समोर आली आहेत. टीव्ही अभिनेते शोएब इब्राहिम Bigg Boss 18 चा पहिला कंटेस्टेंट म्हणून समोर आला आहे. शोचा दुसरा कंटेस्टेंट अर्जुन बिजलानी आहे. लाफ्टर शेफ्स अनलिमिटेड एंटरटेनमेंटच्या नव्या एपिसोडमध्ये अर्जुनला त्याच्या सहकाऱ्यांनी बिग बॉस १८ मध्ये सहभागी होण्यावरून त्याची टिंगल उडवली होती. आ

ता सर्वकाही सुरु होणार आहे, जेव्हा राहुल वैद्यने अर्जुनवर शेफ हरपाल सिंहच्या मिठाईमध्ये मीठ घातल्यावर कॉमेंट केली होती. पुन्हा मजेशीर अंदाजात सांगितलं की, अर्जुनने खतरों के खिलाडी आणि अन्य रिॲलिटी शो केले आहेत. आणि आता केवळ बिग बॉसचं वाचले आहे. भारती सिंहने ओरडत सांगितले की, अर्जुन लवकरचं बिग बॉसमध्ये दिसेल. त्यानंतर त्याची सर्व जण चेष्टा करू लागले. या सर्व गोष्टींवरून अंदाज लावला जात आहे की, अर्जुन बिग बॉस १८ मध्ये दिसेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT