

पुढारी ऑनलाईन डेस्क : अनेकदा सोशल मीडियावर काही ना काही ट्रेंड व्हायरल होतात. बरेच लोक या ट्रेंडचे अनुसरण करतात. परंतु, त्यांना त्यांचा अर्थ काय आहे हे माहित नसते. त्याचप्रमाणे, आजकाल इंस्टाग्रामवर एक रील ऑडिओ व्हायरल होत आहे ती म्हणजे ‘चिन टपाक डम-डम. (Chin Tapak Dum Dum) हा एक व्हायरल ऑडिओ आहे, जो इंस्टाग्रामवर ट्रेंडींगमध्ये आहे. सर्वाच्या जिभेवर असणारे वाक्य हे लहान मुलांच्या कार्टून शो मधले आहे. हे वाक्य आता मीम्स, रिंगटोन आणि इतर मजेदार गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे.
‘चिन टपाक डम-डम’ हे चार छोटे शब्द आजकाल सर्व वयोगटातील लोकांमध्ये लोकप्रिय झाले आहेत. या ऑडिओवर अनेक रील्स आणि मीम्स बनवले जात आहेत. पण हा विचित्र ऑडिओ काय आहे आणि कुठून आला आहे. हे फार कमी लोकांना माहिती आहे. वास्तविक, हे वाक्य लहान मुलांच्या आवडत्या कार्टून शो 'छोटा भीम'मधून घेण्यात आले आहे. या शोमध्ये टाकिया नावाचा खलनायक आहे. हे वाक्य टाकियाच्या पात्राचे आहे. टाकिया जेंव्हा कोणतीही जादुई शक्ती दाखवण्याचा प्रयत्न करतो, तेंव्हा त्याच्या तोंडून हे शब्द बाहेर पडतात. हे वाक्य एकप्रकारे त्याचे कॅचफ्रेज आहे. (Chin Tapak Dum Dum)
छोटा भीम या कार्टून शोमधील 47व्या एपिसोडमध्ये शोमधील खळनायक टाकिया जेव्हा धोलापूरमधील त्याच्या दु:साहसाची आठवण करून देतो, जिथे त्याने वाळू सैनिकांची फौज तयार केली होती." त्यावेळी त्याने हे वाक्य म्हटलेले आहे. टाकियाने संपूर्ण एपिसोडमध्ये त्याच्या संवादांसह 'चिन टपाक डम-डम' हे लोकप्रिय वाक्य वारंवार वापरला. हा डायलॉग सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या दृश्याची क्लिप इंटरनेटवर व्हायरल होताच लोकांनी त्यावर व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली.
वास्तविक, "चिन टपाक डम-डम" च्या लोकप्रियतेची सुरुवात भारतीय ॲनिमेटेड लहान मुलांच्या शो 'छोटा भीम'पासून झाली. ही मालिका पहिल्यांदा 2008 मध्ये पोगो टीव्हीवर व्हायरल झाली होती. या कार्टून मालिकेत एक दुष्ट जादूगार दाखवण्यात आला आहे जो अनेकदा या लोकप्रिय कॅचफ्रेजचा वापर करतो. (Chin Tapak Dum Dum)
विचित्र ट्रेंडसाठी ओळखल्या जाणाऱ्या इंटरनेटने हे बेताल वाक्य पटकन स्वीकारले. "चिन टपाक डम-डम" लवकरच एक लोकप्रिय मेम टेम्पलेट बनले. अनेक वापरकर्त्यांसाठी एक मजेदार सूचना रिंगटोन देखील तयार केली. नेटिझन्स आता अनेक परिस्थितींमध्ये हुशारीने ते समाविष्ट करतात. हा ट्रेंड जसजसा वाढत आहे, तसतसे लोक त्यांचा रिंगटोन किंवा नोटिफिकेशन साउंड म्हणून "चिन टपाक दम दम" सेट करत आहेत. इंस्टाग्राम रील्स, ट्विट आणि यूट्यूब व्हिडिओ या विचित्र कॅचफ्रेजने भरलेले आहेत.