मनोरंजन

Saiee Manjrekar : दिग्दर्शकाच्या मुलाला डेट करतेय सई

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन:  दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची कन्या अभिनेत्री सई मांजरेकर ( Saiee Manjrekar ) हिने सलमान खानच्या 'दबंग 3' मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. या वर्षात ती अभिनेता आदिवी शेष याच्या 'मेजर' या चित्रपटात दिसणार आहे; पण सध्या सई तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आली आहे.

निर्माता-दिग्दर्शक साजिद नाडियादवाला यांचा मुलगा सुभान याला सई ( Saiee Manjrekar ) डेट करत असल्याची माहिती आहे. सुभान आणि सई या कपलला अनेकदा लंच आणि डिनर डेटवर एकत्र पाहिले गेले आहे.

गुरुवारी रात्रीही दोघांना एकत्र स्पॉट केले गेले होते. तेव्हा दोघांनी पापाराझींना फोटो काढू नका, अशी विनंतीही केली. दोघांना एकत्रित फोटो देण्यासही नकार दिला. रिलेशनवर शिक्‍कामोर्तब करण्याआधी दोघे एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत, असे कळते.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT