Zaheer Khan Sagarika Ghatge Son
मुंबई : दिग्गज क्रिकेटर झहीर खान आणि त्याची पत्नी, अभिनेत्री सागरिका घाटगे यांच्या घरी पाळणा हलला आहे. त्यांनी बाळाचे स्वागत केले असून मुलाचे नावदेखील ठेवले आहे. बुधवारी (१६ एप्रिल) सकाळी सागरिका आणि झहीर यांनी सोशल मीडियावर एक सुंदर ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर करत ही गुड न्यूज दिलीय.
या कपलने बुधवारी एक पोस्ट शेअर करून ही गुड न्यूज दिली. कपलने फोटो शेअर केले असून त्यामध्ये जहीरने बाळाला कुशीत घेतलं आहे. तर सागरिकाने जहीरच्या खांद्यावर हात ठेवला आहे. आणखी एका फोटोमध्ये जहीरने बाळाचा हात धरला आहे. त्यांनी मुलाचे नाव 'फतेहसिंह खान' ठेवले आहे.
त्यांनी इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत लिहिलंय-With love, gratitude and divine blessings we welcome our precious little baby boy, Fatehsinh Khan. सागरिकाच्या या पोस्टवर सेलेब्स आणि चाहते अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.
काही वर्षांच्या रिलेशननंतर दोघांनी २०१७ मध्ये लग्न केले. हा खासगी विवाह सोहळा होता. पण नंतर त्यांनी मुंबईमध्ये ग्रँड रिसेप्शन देखील दिलं होतं.
सागरिका आणि झहीरची ओळख अंगद बेदी आणि इतर काही मित्रांमुळे झाली होती. त्यानंतर दोघांनी जवळपास दीड वर्ष एकमेकांना डेट केले. त्यानंतर २०१७ मध्ये लग्न केले. सागरिकाने पहिल्यांदा मॉडेल म्हणूनही काम केले. 'चक दे इंडिया'मध्ये तिने प्रीती सबरवालची भूमिका साकरली. या चित्रपटातील भूमिकेसाठी सागरिकाला स्क्रीनचा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानसोबत सागरिकाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर तिने 'फॉक्स', 'मिले ना मिले हम', 'रश' या गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले. याशिवाय सागरिकाने अतुल कुलकर्णीसोबत 'प्रेमाची गोष्ट' या मराठी चित्रपटातही काम केले.