पुढारी ऑनलाईन डेस्क : पंजाब किंग्जने मंगळवारी आयपीएलच्या इतिहासातील अल्प धावसंख्येचा बचाव करत विजय नोंदवला. कोलकाता नाइट रायडर्सच्या विरुद्ध झालेल्या सामन्यात युजवेंद्र चहलने दमदार गोलंदाजी करत ४ विकेटस् घेतल्या. त्याच्या या कामगिरीने आरजे महवश आणि पंजाब किंग्जची मालकीन प्रीति झिंटा यांना खूश केले. कोरियोग्राफर धनश्री वर्मा हिच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि आरजे महवश (RJ Mahvash) यांच्यात गेल्या काही दिवसांपासून जवळीक वाढली आहे. त्यांच्या डेटिंग सुरु असल्याची चर्चा सुरु आहे.
दरम्यान, आरजे महवश हिने केलेल्या एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सामना संपल्यानंतर महवशने इन्स्टाग्राम स्टोरीजवर चहल सोबत घेतलेली सेल्फी पोस्ट केली. तिने सेल्फी शेअर करत म्हटले आहे, ''व्हॉट अ टॅलेंटेड मॅन! आयपीएलमध्ये सर्वांधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे!!! असंभव!.''
आरजे महवशने एक रीलदेखील शेअर केली. ज्यात तिने आधुनिक काळातील ब्रेकअप्सच्या कटू सत्यावर भाष्य केले आहे. या क्लिपला कॅप्शन देताना तिने म्हटले आहे, 'जा, मी तुला माफ केले, आता तू इथे नाहीस!' ती पुढे व्हिडिओत म्हणते, 'आजच्या जनरेशनमधील ब्रेकअप इतके वाईट का आहेत मित्रा?' ब्रेकअपला तुमच्या जीवनाचा एक छोटासा भाग बनवा. निम्मा वेळ तर आमच्यातील द्वेष समोरच्या व्यक्तीला त्याने केलेल्या कृत्याबद्दल पश्चात्ताप करायला संधी देत नाही. तुमची माफी त्याचा भार हलका करेल. माझ्यावर विश्वास ठेवा, लेट इट गो! मित्रा, हे आयुष्य आहे, तुला वाटते ते तुझ्या हातात आहे पण सगळे काही ठरलेले असते...'
यावर अनेक यूजर्संनी असा अंदाज लावला की तिची ही पोस्ट अप्रत्यक्षपणे चहल याच्यासाठी होती. एका फॉलोयरने कमेंटमध्ये म्हटले आहे, “ही रील चहल भाईसाठी होती.” दुसऱ्या एकाने लिहिले आहे, “हा व्हिडिओ तर चहल भाईसाठीच होता,” तर तिसऱ्याने कमेंटमध्ये म्हटले आहे, “एक दिवस चहल भाईही पुढाकार घेईल.”
महवशने नुकतीच चंदीगडमधील पंजाब किंग्जच्या आयपीएलच्या सामन्यावेळी उपस्थिती दर्शवली होती. त्यानंतर तिने स्टेडियमधील अनेक फोटो पोस्ट केले. त्यातील एका फोटोत ती स्टँड्समधून चियर करताना दिसली. दुसऱ्या एका फोटोत तिने चहलसोबत सेल्फी घेतली.
आरजे महवश उत्तर प्रदेशातील अलीगढ येथील आहे. तिने अलीगढ मुस्लिम विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर महवश आरजे बनली. चहल आणि महवश यांच्यात डेटिंगच्या अफवा पहिल्यांदा डिसेंबर २०२४ मध्ये समोर आल्या होत्या. त्यावेळी महवशने चहल आणि त्याच्या मित्रांसोबत झालेल्या ख्रिसमस गेट -टुगेदरचे फोटो शेअर केले होते. त्यानंतर चहल एका मिस्ट्री गर्ल सोबत दिसला. ती दुसरी तिसरी कोण नव्हती तर महवश होती. याआधी दोघेही दुबईमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यावेळी उपस्थित राहिले होते. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.