नुकताच क्यों की सास भी कभी बहू थी या मालिकेचा प्रीमियर झाला. या मालिकेचा सध्या अनेक आठवडे टीआरपीच्या स्पर्धेत नंबर वन असलेल्या अनुपमावर परिणाम होणार असे चाहते म्हणत आहेत. क्यों कीची घोषणा झाल्यापासून या दोन्ही मालिका टीआरपीसाठी भिडणार असल्याच्या चर्चा आधीपासून सुरू होता. अनेकांनी तर अनुपमा बंद करण्याचीही मागणी केली. (Latest Entertainment News)
आता यावर अनुपमा फेम रुपाली गांगुलीने स्पष्ट उत्तर दिले आहे. यावर रुपाली म्हणते, ‘ हे दोन्ही शो एकमेकांचे स्पर्धक आहे असे चित्र उभे करने अत्यंत चुकीचे आहे. एका मुलाखतीदरम्यान तिने हा खुलासा केला आहे. ती पुढे म्हणते क्यों की सास भी कभी बहू थी ही टीव्हीवरची आयकॉनिक मालिका आहे. हा एक असा शो आहे ज्याने एका पिढीला बांधून ठेवले आहे. आम्हाला अभिमान आहे की असा शो आमच्या चॅनलवर परत दिसतो आहे.
या मालिकेबाबत बोलताना एकता कपूर म्हणते, क्यो कीची वापसी कोणत्या स्पर्धेसाठी नाही तर एका नव्या पटकथेसाठी होत आहे. दोन महिलांना एकमेकींविरुद्ध उभे करणे ही जुनी गोष्ट झाली आहे. हे कुणासाठीच योग्य नाही. असे चित्र उभे केले जात आहे की रीबुटमुळे अनुपमाच्या लोकप्रियतेला धक्का पोहचू शकतो. हे अत्यंत चुकीचे आहे. रुपाली गांगुली एक उत्तम अभिनेत्री आहे. अनुपमाचे निर्माता राजन शाहीने अनुपमाच्या लोकप्रियतेच्या माध्यमातून जे मिळवले आहे ते कोणी करू शकणार नाही. ते नंबर 1 आहेत आणि राहतील.
अनुपमा एक अत्यंत लोकप्रिय शो आहे. मराठीतील आई कुठे काय करते या मालिकेचे हे हिंदी अडोप्शन आहे. या मालिकेने रुपाली गांगुली यांना सुपरस्टार बनवले. तर क्यों की सास भी कभी बहू थी मालिकेचा काल प्रीमियर बनवला आहे.