मुंबई - विनोदी भूमिकेसाठी प्रसिद्ध तमिळ अभिनेते रोबो शंकर यांचे वयाच्या ४६ व्या वर्षी निधन झालेय ते एका चित्रपटाच्या सेटवर बेशुद्ध झाल्यानंतर चेन्नईच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रिपोर्ट्सनुसार, रक्तदाबात अनिश्चित झाल्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. उपचारादरम्यान, त्यांचे गुरुवारी सायंकाळी निधन झाले.
प्रसिद्ध तमिळ अभिनेते आणि हास्य कलाकार रोबो शंकर यांच्या निधनाने तमिळ चित्रपट इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. बुधवारी शूटिंग दरम्यान, अचानक सेटवरर बेशुद्ध झाल्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रोबो शंकर यांनी धनुष स्टारर मारी, विशालच्या इरुम्बु थिराई आणि विष्णु विशालच्या वेल्लैनु वंधुत्ता वेल्लईकरन यासारख्या चित्रपटांमध्ये अभिनय केला होता.
शंकर यांच पार्थिव शुक्रवारी त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. त्यांच्या मागे पत्नी प्रियांका आणि मुलगी इंद्रजा आहे.
तमिळ चित्रपट उद्योगातील अनेक कलाकारांनी रोबो शंकर यांच्या निधनावर दु:ख आणि संवेदना व्यक्त केल्या आहेत. अभिनेते कमल हासन यांनी एका तमिळ कवितेच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे आणि ते म्हणाले की, रोबो शंकर त्यांच्यासाठी छोट्या भावाप्रमाणे होते. त्यांनी लिहिलं की, "केवळ यासाठी की तू निघून गेलास, याचा अर्थ हा नाही की, तू मला सोडून गेला आहेस."
दिग्दर्शक वेंकट प्रभु यांनी सोशल मीडिया अकाऊंटवर लिहिलं, "RIProboshankar खूप लवकर निघून गेलास माझ्या मित्रा. परिवार आणि मित्रांच्या प्रति माझ्या संवेदना."
अभिनेत्री वरलक्ष्मीने एक्स टाईमलाईनवर दिवंगत अभिनेत्याशी चार दिवसांपूर्वी झालेल्या बातचीतचा उल्लेख करत लिहिलं, हे त्यांच्यालाठी अत्यंत दु:खद आहे. अभिनेत्री सिमरनने देखील लिहिलं की, रोबो शंकर यांनी लाखो लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणलं आणि त्यांचा पोकळी कधी भरून न निघणारी आहे.
अभिनेता सिलंबरासन उर्फ सिम्बु म्हणाला, "एक अशा व्यक्तीला दु:खद आहे, जो नेहमी विनोद करत होता. त्यांचे हास्य आमच्या नेहमी लक्षात राहिल. मी ईश्वराकडे प्रार्थना करतो की, त्यांच्या आत्म्याला शांती मिळो."