काकुडा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज Instagram
मनोरंजन

सोनाक्षी सिन्हा-रितेश देशमुखच्या 'काकुडा' चित्रपटाचा ट्रेलर

का आहे पुरुषांवर टांगती तलवार... कोण आहे काकुडा?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : झी ५ ने भय-विनोदीपट काकुडाचा ट्रेलर प्रदर्शित केलाय. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित आणि RSVP निर्मित या कलाकृतीत सोनाक्षी सिन्हा, रितेश देशमुख, साकिब सलीम आणि आसिफ खान झळकणार आहेत. या ट्रेलरमध्ये रतोडी गावाला भेडसावणाऱ्या विचित्र शापाची एक चित्तवेधक झलक दिसते. काकुडाचा प्रीमियर १२ जुलै रोजी होणार आहे.

ट्रेलरमध्ये दाखविल्याप्रमाणे, काकुडा’मध्ये सनीची भूमिका साकारणारा साकिब सलीम हा एक कमी शिकलेला माणूस आहे, जो सोनाक्षी सिन्हाने साकारलेल्या इंदिराच्या प्रेमात पडतो. एकत्र राहण्याचा निर्धार करून, ते लग्न करतात आणि काकुडा’च्या शापाने झपाटलेल्या रतोडी गावात जातात. त्यांच्या लग्नाच्या रात्री, सनी ‘काकुडा’साठी संध्याकाळी सव्वा सात वाजता लहान दरवाजा उघडण्यात अयशस्वी होतो, ‘काकुडा’ला आयतेच आमंत्रण मिळते. हे एक दुष्ट भूत, जे घरच्या माणसाला पाठीवर कुबड देऊन शिक्षा करतो. शापित मनुष्य तेराव्या दिवशी मृत होतो. सनीच्या आयुष्याची दोरी अधांतरी लटकत असताना, इंदिरा ही रितेश देशमुखने साकारलेल्या विचित्र भूत शिकारी, व्हिक्टरची मदत मागते.

सरपोतदार म्हणाले, 'काकुडा'चा ट्रेलर म्हणजे आम्ही तयार केलेल्या एका अनोख्या लोककथेच्या आकर्षक कथानकाची फक्त एक झलक आहे. हा एक मजेदार, भीतीदायक आणि अविस्मरणीय अनुभव ठरेल".

रितेश देशमुख म्हणाला, 'काकुडा'च्या विचित्र आणि विलक्षण जगाचा भाग बनण्याची संधी मला मिळाली म्हणून रोमांचित वाटते. व्हिक्टर या अपारंपरिक भूत शिकारीची भूमिका साकारलीय. मी आतापर्यंत साकारलेल्या पात्रांपेक्षा हे पात्र निराळे आहे. यामुळेच ते इतके रोमांचक वाटते. सोनाक्षी सिन्हा आणि साकिब सलीम यांच्यासारख्या प्रतिभावान सहकलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी आभारी आहे.'

सोनाक्षी सिन्हा म्हणाली, 'काकुडा'मध्ये मी अंधविश्वासावर नव्हे तर विज्ञानावर विश्वास ठेवणाऱ्या मुलीची भूमिका साकारत आहे. तथापि, जेव्हा तिला या विचित्र स्थितीचा सामना करावा लागतो, तेव्हा ती अधिक खोलवर जाऊन त्यामागील सत्य जाणून घेण्याचे ठरवते. मला हे मान्य करावेच लागेल की, भय आणि विनोद यांच्यातील समतोल साधणे हे एक आव्हानात्मक काम आहे. लोकांना हसवणे सोपे नसते. माझे सहकलाकार रितेश, साकिब आणि आसिफ, सगळे वास्तविक जीवनातही इतकेच मजेदार आहेत.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT