Riteish Deshmukh rules for wife and children's  instagram
मनोरंजन

Riteish Deshmukh rules in own house | रितेश देशमुखने जेनेलियासाठी ठेवलेत 'हे' खास नियम; मुलेही म्हणतात- 'बाबा आता बस...'

Riteish Deshmukh rules in own house | रितेश देशमुखने जेनेलियासाठी ठेवलेत हे खास नियम; मुले म्हणतात- 'बाबा आता...'

स्वालिया न. शिकलगार

बॉलिवूडचे लाडकं जोडपं रितेश आणि जेनेलिया त्यांच्या केमिस्ट्रीमुळे नेहमीच चर्चेत असतात. मात्र, रितेश वैयक्तिक आयुष्यात खूप शिस्तप्रिय आहे. त्याने जेनेलिया आणि दोन्ही मुलांसाठी (रियान आणि राहील) काही खास नियम ठरवले आहेत.

चित्रपटसृष्टीतील लव्हबर्ड कपल रितेश देशमुख आणि जेनेलिया यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलजाणून घ्यायल फॅन्सना नेहमीच आवडते. आता रितेश देशमुख आपल्या स्वत:च्या घरामध्ये नियम लावत असेल तर ऐकणाऱ्याला ते थोडं आश्चर्य वाटेल. पण ते खरं आहे. जेव्हा 'द कपिल शर्मा शो'मध्ये ते कपल आले होते, तेव्हा जेनेलियाने रितेशच्या या एका विचित्र पण मजेशीर नियमाचा खुलासा केला होता. या नियमामागची नेमकी गोष्ट गोष्ट काय आहे, हे जाणून घेऊया.

कपिल शर्माच्या शोमध्ये जेनेलियाने सांगितले की, रितेशने सर्वांसाठी खास नियम बनवलेत, जे पाळावे लागतात. मग पत्नी असो वा मुले, सर्वांसाठी ते समान नियम असतील.

प्रश्नांचा कोटा

जेनेलियाने सांगितले की, रितेशने तिच्यासाठी दिवसाला फक्त १० प्रश्न विचारण्याचा नियम किंवा 'कोटा' ठरवून दिला आहे. जर तिने सकाळीच ५-६ प्रश्न विचारून टाकले, तर रितेश तिला आठवण करून देतो की, "तुझे फक्त ४ प्रश्न शिल्लक आहेत, विचार करून वापर!"

नियम का बनवला?

रितेशच्या मते, स्त्रियांना प्रश्न विचारण्याची खूप सवय असते. अनेकदा कामावरून आल्यावर किंवा आरामाच्या वेळी प्रश्नांची सरबत्ती नको म्हणून त्याने गंमतीने हा नियम बनवला होता.

जेनेलियाची प्रतिक्रिया

जेनेलियाने हसून सांगितले की, या नियमामुळे ती आता प्रश्न विचारण्यापूर्वी खूप विचार करते. इतकचं नाही तर जेनेलियाने आपल्या मुलांबद्दल सांगितले की, ''... पण माझी मुले...या गोष्टी फार गंभीरपणे घेत नाहीत. मुलांची प्रश्ने कधीच संपत नाही, उलट ती वाढत जातात.''

कपिलची फिरकी

यावर कपिल शर्माने नेहमीच्या स्टाईलमध्ये म्हटले होते की, "हा नियम फक्त बायकोसाठी आहे की बाहेरच्यांसाठी सुद्धा?" त्यावर प्रेक्षकांमध्ये हशा पिकला होता.

दुसरे म्हणजे, जेव्हा कपिलने जेनेलियाला विचारले की, शेवटचे जोरदार भांडण कधी झाले होते? यावर जेनेलिया म्हणाली की, आठवत नाही, पण असे कधी आमच्यात जोरदार भांडण झाले नाही. शिवाय, जेनेलियात आणि रितेश यांच्यात भांडण झाले तर पहिल्यांदा सॉरी बोलतं. यावर रितेश काही लाजत-हसत म्हणतो...''आणखी कोण सॉरी म्हणणार...मीच म्हणतो. घरामध्ये शांतता राहण्यासाठी मीच शांत बसतो.''

हा किस्सा सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. कारण तो अनेक विवाहित जोडप्यांना स्वतःच्या आयुष्याशी जोडणारा वाटला. रितेश हा स्वभावाने शांत आहे, तर जेनेलिया खूप बोलकी आहे, त्यामुळे त्यांच्यातील ही केमिस्ट्री फॅन्सना खूप आवडते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT