पुढारी ऑनलाईन; २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या सैराट चित्रपटाने अभिनेत्री रिंकू राजगुरू ( Rinku Rajguru ) हिला प्रकाशझोतात आणले. यानंतर रिंकूने 'सैराट' ची सुसाट गाडी पुढे नेत 'मेकअप', 'कागर' आणि 'झुंड' या चित्रपटात काम केले. रिंकूच्या सैराटमधील आर्चीच्या भूमिकेने चाहत्यांना भारावून सोडले. याशिवाय तिच्याकडे लवकरच आणखी एका नव्या चित्रपटाची ऑफर मिळाण्याची माहिती समोर आली आहे. याच दरम्यान सध्या रिकूने आणखी एकदा काही पारंपारिक लूक चाहत्यांच्या भेटीस आणला आहे.
नुकतेच रिंकूने ( Rinku Rajguru ) आपल्या इंन्स्टाग्रामवर पारंपारिक लूकमधील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिने निळ्या रंगाच्या साडीसोबत लाल रंगाचे स्लिव्हलेस ब्लाउज परिधान केले आहे. हा तिचा लूक खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.
याआधी तिने गुलाबी रंगाच्या साडीसोबत निळ्या रंगाचे ब्लाउज परिधान केले होते. दोन्ही फोटोत ती सुंदर दिसत आहे. या फोटोतील खास म्हणजे, आधी परिधान केलेल्या निळ्या रंगाच्या ब्लाउजच्या रंगाची साडी तिने यावेळी परिधान केल्याचे दिसते.
या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'जिंदगी तेरी नाराजगी से क्या होगा, मेरी मुस्कुराहट मेरी आदत में शुमार है… 'असे लिहिले आहे. याशिवाय रिकूने या फोटोत सौम्य मेकअप, साजेशीर दागिन्यासोबत केसांत गजरा माळला आहे. तिचा हा लूकने चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी वेगवेगळ्या कॉमेंन्टस केल्या आहेत. यात एका युजर्सने रिकूला 'अभिनेत्री श्रीदेवी दिसत आहेस.' तर दुसऱ्या एकाने 'अप्रतिम सौंदर्य, खूप छान दिसत आहेस.' असे लिहिले आहे. तर आणखी एका युजर्सने 'गजरा मोहब्बत वाला आँखीयों मैं ऐसा डाला गजरेने लेली मेरी जान हाय रे मैं तेरे कुर्बान 'असे गाण्याचे बोल लिहिले आहे. याशिवाय काही चाहत्यांनी हार्ट आणि फायरचे खूपसारे ईमोजी शेअर केले आहेत.
याआधीही तिचा गुलाबी रंगाच्या साडीतील लूक खूपच व्हायरल झाला होता. गुलाबी रंग रिंकूवर खुलून दिसत होता. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'एक गुलाबी दिवस'. असे लिहिले होते. याशिवाय रिकूचे जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते आश्चर्यचकित झाले होते.
रिकूने नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असून ती आपले फोटोज शेअर करत असते. नुकतेच रिंकू मणिरत्नम यांचे सहाय्यक दिग्दर्शक राम महिंद्र यांच्या आगामी बॉलिवूड चित्रपटात दिसणार असल्याची माहिती समोर आली होती.
हेही वाचलंत का?