Rhea Chakraborty  Pudhari
मनोरंजन

Rhea Chakraborty: अभिनय सोडला… एक वर्षात उभी केली 40 कोटींची कंपनी; रिया चक्रवर्तीचे जबरदस्त कमबॅक

Rhea Chakraborty Fashion Brand: रिया चक्रवर्तीने अभिनय सोडून उद्योजकतेत एन्ट्री करत फक्त एका वर्षात Chapter 2 Drip हा कपड्यांचा ब्रँड उभा केला. आज तिचा ब्रँड ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही ठिकाणी झपाट्याने वाढत आहे.

Rahul Shelke

Rhea Chakraborty Business Success Story: बॉलिवूडमध्ये दीर्घकाळ काम केल्यानंतर, अभिनेत्री रिया चक्रवर्तीने आता बिझनेझ क्षेत्रात एन्ट्री केली आहे. रिया चक्रवर्तीचे नाव अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर चर्चेत आले होते. या घटनेनंतर, रियाला बॉलिवूडमध्ये स्वतःचे नाव कमवण्यासाठी संघर्ष करावा लागला. तिने अभिनय सोडून आता व्यवसाय सुरू केला आणि अवघ्या एका वर्षात तिने 40 कोटींची कंपनी उभी केली. अलिकडेच, रियाने एका पॉडकास्टमध्ये तिच्या कपड्यांच्या ब्रँड, चॅप्टर 2 ड्रिप बद्दल सांगितले.

2020 मध्ये कोविड-19 आला आणि या काळात अनेक बॉलिवूड स्टार्सचे निधन झाले, ज्यात इरफान खान, ऋषी कपूर आणि सुशांत सिंग राजपूत यांचा समावेश होता. सुशांतच्या मृत्यूनंतर, रिया चक्रवर्तीचे नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत आले आणि याचा तिच्या प्रतिमेवर परिणाम झाला. म्हणूनच रिया चक्रवर्तीला बॉलिवूडमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी संघर्ष करावा लागला.

बिझनेस कसा सुरू झाला?

रियाने सांगितले की, सुशांत सिंग राजपूत प्रकरणात अटक झाल्यानंतर ती खूप निराश झाली होती. तेव्हाच तिने बॉलिवूडमधून बाहेर पडत कपड्यांचा चॅप्टर 2 ड्रिप ब्रँड सुरू करण्याचा निर्णय घेतला, ज्यामध्ये मध्यमवर्गीयांना टार्गेट करून उत्पादने तयार केली. रियाने ऑनलाइन स्टोअरसह तिचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर, जून 2025 मध्ये, तिने पहिले ऑफलाइन स्टोअर लाँच केले.

वांद्रे येथे ऑफलाइन स्टोअर सुरु केले

रियाने मुंबईतील पॉश वांद्रे परिसरात तिच्या कपड्यांच्या ब्रँडचे पहिले ऑफलाइन स्टोअर सुरु केले. या कामात तिचा पार्टनर शौविकनेही महत्त्वाची भूमिका बजावली. तिच्या ब्रँडला किशोर आणि आशनी बियाणी यांच्याकडून ₹ 1 कोटी फंड मिळाला. एका वर्षातच तिच्या ब्रँडचे मूल्यांकन ₹40 कोटींपेक्षा जास्त झाले आहे.

रिया ब्रँडचे मार्केटिंग कसे करते?

रियाने सांगितले की ती लोकांना तिच्या पॉडकास्ट शोमध्ये आमंत्रित करते आणि तिच्या कंपनीबद्दल बोलते. ती तिची उत्पादने दाखवते आणि गुंतवणुकीची ऑफर देते आणि ज्यांना या कंपनीत वाढ दिसते त्यांच्याकडून गुंतवणूक मिळते. तिने सांगितले की ब्रँड जसजसा वाढत जातो तसतसा लोकांचा विश्वास वाढतो. मार्केटिंगसोबतच कंपनीची गुंतवणुकीची क्षमता देखील वाढते.

कपड्यांची किंमत किती आहे?

रियाच्या ब्रँडेड कपड्यांची किंमत मध्यमवर्गीयांना लक्षात घेऊन ठेवली आहे. कंपनीच्या डेनिमची किंमत ₹5,500 आहे, तर पांढऱ्या टी-शर्टची किंमत ₹ 2,290 आहे. अँटी-एव्हरीथिंग क्लब जॅकेटची किंमत ₹ 1,790 आहे आणि को-ऑर्डर सेटची किंमत ₹ 7,990 पासून सुरू होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT