रेखा आणि अमिताभ Pudhari
मनोरंजन

Amitabh Bachchan: पुन्हा एकदा रेखा- अमिताभ चर्चेत, दिग्दर्शकाचा गौप्यस्फोट, काय दावा केला वाचा?

Rekha And Amitabh: या सिनेमाच्या निमित्ताने जुन्या आठवणीनं उजाळा देणयासोबतच मुजफ्फर यांनी रेखा आणि अमिताभ यांच्या नात्याबद्दल केलेल्या खुलासा नव्याने समोर आला आहे

अमृता चौगुले

Rekha and amitabh affair controvercy:

रेखा हे नाव अभिनयाच्या बाबत ज्या सिनेमाने सिनेसृष्टीत प्रस्थापित केले तो सिनेमा म्हणजे उमराव जान. हा सिनेमा 27 जूनला थिएटरमध्ये पुनः रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक मुजफ्फर अली यांनी या सिनेमाच्या निमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा देण्यासोबतच त्यांनी रेखा आणि अमिताभ यांच्या नात्याबद्दल केलेल्या खुलासा नव्याने समोर आला आहे. यासर उस्मान यांनी लिहिलेल्या रेखाच्या Rekha: the untold storyआटोबायोग्राफीमध्ये हा उल्लेख आहे.

रेखाच्या आयुष्यातील दोन महत्त्वाचे सिनेमे उमराव जान आणि सीलसिले एकाच वर्षी म्हणजे 1981 साली रिलीज झाले होते. त्यावेळी या दोघांचे नातेही तितक्याच फॉर्ममध्ये होते.

पुस्तकात मुजफ्फर म्हणतात, रेखा अतिशय संवेदनशील महिला आहे. त्यावेळी उमराव जानचे शूटिंग दिल्लीमध्ये सुरू होते. शूटिंग दरम्यान अमिताभ सेटवर येऊन बसत असत.

विशेष म्हणजे रेखा त्यावेळी अमिताभ यांचा उल्लेख करताना 'यांना', यांनी (इन्होने, इनको) असा करायची. जसे एखादी विवाहित महिला आपल्या पतीला संबोधताना करते अगदी तसा. मला असे वाटायचे ती त्यावेळी स्वत: विवाहित समजत असून अमिताभ यांना पती मानायची.’

त्या दोघांनी लग्न करायला हवे होते..

पुस्तकात पुढे म्हणले आहे, ‘ मुजफ्फर अली हे स्पष्टवक्ते होते. ते कायम म्हणायचे रेखा अमिताभवर खूप प्रेम करते. अमिताभने त्यांना एक ओळख देणे गरजेचे होते. अमिताभ यांनी रेखासोबत लग्न करायला हवे होते.’

अमिताभ आणि रेखा यांचा एकत्र असलेला शेवटचा सिनेमा म्हणजे सिलसिले. असे म्हणले जाते हा सिनेमा बऱ्याच अंशी त्यांच्या खऱ्या आयुष्यावर बेतला होता. या सिनेमाच्या शूटिंगवेळी दिग्दर्शक यश चोप्रा यांनाही हीच भीती वाटत असायची की हा सिनेमा रील आणि रियल लाईफमध्ये फार कमी अंतर ठेवून होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT