

Haunted Shooting locations in mumbai
काजोलने नुकतेच मां सिनेमादरम्यानच्या शूटिंगचा रामोजी फिल्मसिटीमधील अनुभव शेयर केला. त्यावेळी आलेल्या नकारात्मक आणि भयावह अनुभवाबाबत तिने शेयर करताच आम्हालाही आठवले ते बॉलीवूडच्या सर्वात हॉन्टेड शूटिंग लोकेशनबाबत. काही हॉरर सिनेमे अनेकदा रियल लोकेशनवरही शूट केले जातात. तुम्हाला माहिती आहे का? मुंबईतही असे काही लोकेशन्स आहेत जे हॉन्टेड म्हणून ओळखले जातात. यापैकी एक आहे कुलाब्याचे मुकेश मिल्स हे त्या लोकेशनपैकी एक आहे. तिथे शूटिंग करताना काही कलाकारांना इतके भयानक अनुभव आले की 2019 नंतर ही जागा शूटिंगसाठी बंद करण्यात आली.
हा किस्सा अभिनेत्री काम्या पंजाबीने शेयर केला. याठिकाणी शूटिंगला काम्याची नवीन कार खराब झालीच शिवाय तिचे सामानही चोरीला गेले. प्रत्यक्षात शूटिंग सुरू झाल्यावर मात्र क्रूमधली एक मुलगी अचानक पुरुषी आवाजात ओरडू लागली, तिचा चेहरा वाकडा झाला. हे पाहून प्रत्येकालाच धास्ती बसली. त्यानंतर नेटाने आम्ही शूटिंग पूर्ण केले पण मला परत तिथे जायची इच्छा झाली नाही
या लोकेशनबाबत अभिनेता आयुष्मान खुरानाने इन्स्टाग्राम पोस्ट शेयर केली होती. यात तो म्हणतो की या ठिकाणी लोक अंधार पडल्यानंतर शूटिंग करत नाहीत कारण त्यांना वाटते ही जागा हॉन्टेड आहे.
अमिताभ यांच्या हम सिनेमातील जुम्मा चुम्मा दे दे या गाण्याचे शूटिंगही याच हॉन्टेड लोकेशनवर झाले आहे. याशिवाय सडक सिनेमाचा एक सीनही इथेच शूट झाला होता. अमिताभ या अनुभवाबाबत बोलताना म्हणतात, ‘ तिथे मशीन तशाच आहेत, इकडे तिकडे पसरलेले सामान, आगीमुळे झालेले नुकसान यामुळे ती जागा आणखी भयावह आणि नकारात्मक वाटते.
फुटपाथ सिनेमाच्या शूटिंगवेळी बिपाशाला ही या जागेचा भयानक अनुभव आला. फुटपाथ सिनेमाचा एक मोनोलॉग आहे जो मुकेश मिल्स येथे शूट करण्यात येत होता. त्यावेळी तिला असे वाटायचे कोणीतरी तिला डायलॉग म्हणण्यापासून थांबवत आहे. यानंतर ती सतत तिचे डायलॉग विसरू लागली. यानंतर तिला त्या जागेपासून लांब नेण्यात आल्याचे सांगितले.
2000 मध्ये बंद पडलेल्या या मिलबाबत एक दुर्घटना घडल्याचे सांगितले जाते. 1982 मध्ये या मिलला आग लागली होती ज्यात अनेक कामगार मारले गेले होते. तेव्हापासून ही जागा ओसाड आहे तसेच झपाटलेली म्हणून कुप्रसिद्ध आहे.