rashmika mandanna  
मनोरंजन

Rashmika Mandanna : ‘या’ अभिनेत्यांसोबत काम करण्यास दिला नकार

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन

साऊथच्या दिग्गज दिग्दर्शकांची पसंत रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) हिला आहे. त्याचबरोबर, बॉलीवूड चित्रपट इंडस्ट्रीतीलही अनेक मोठे दिग्दर्शक रश्मिका मंदानाला (Rashmika Mandanna) आपल्या चित्रपटात घेऊ इच्छितात. पण, कदाचित खूप कमी लोकांना माहिती असेल की, रश्मिकाने बॉलीवूडच्या अनेक सुपरस्टार्ससोबत काम करण्यास सपशेल नकार दिलाय. बॉलिवूड ऑफर मिळूनदेखील तिने ती स्वीकारलेली दिसत नाही.

रश्मिकाने बॉलीवूडच्या कोणत्या चित्रपटांची ऑफर नाकारली आणि आणि त्या चित्रपटात कोणते बॉलीवूड स्टार्स अभिनय करणार होते, जाणून घेऊया.

कार्तिक आर्यन

रश्मिकाने दाक्षिणात्य चित्रपट इंडस्ट्रीमध्ये चित्रपट 'किरिक पार्टी'तून डेब्यू केला होता. साऊथमध्ये या चित्रपटाच्या यशानंतर चित्रपट निर्मात्यांनी या चित्रपटाचा हिंदी वर्जन 'किरिक पार्टी रिमेक' बनवण्याचा निर्णय घेतला होता. या चित्रपटामध्ये कार्तिक आर्यनला रश्मिका सोबत साइन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण, रश्मिकाने स्वत:च्याच चित्रपटाच्या रिमेकमध्ये काम करण्यास नकार दिला. तिचं म्हणणं होतं की, एकचं भूमिका तिला वारंवार पडद्यावर साकारायची नाहिये.

शाहिद कपूर

शाहिद कपूरचा चित्रपट 'जर्सी' रिलीज होण्यास सज्ज झाला आहे. या चित्रपटामध्ये शाहिद कपूरसोबत मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत आहे. पण, याविषयी खूप कमी लोकांना माहिती असेल की, या चित्रपटाच्या दिग्दर्शकाची पहिली पसंती रश्मिका होती. पण, तिने हा चित्रपट करण्यास नकार दिला.

थलापति विजय

साऊथ 'मास्टर' सुपरस्टार थलापति विजयसोबत काम करण्यास एखाद्या अभिनेत्रीने नकार दिला तर खूप आश्चया गोष्ट आहे. विजयसोबत काम करण्याचं अनेक अभिनेत्रींचं स्वप्न आहे. विजयने आपल्या करिअरमध्ये सर्वात सुपरहिट चित्रपट दिले आहेत. मास्टर हा त्याचा गाजलेला चित्रपट आहे. या चिपटातील मुख्य अभिनेत्री म्हणून निर्मात्यांनी सर्वात आधी रश्मिकाला ऑफर दिली होती. पण, दुसऱ्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी असल्याने तिने ही ऑफर नाकारली होती.

रणदीप हुड्डा

बॉलीवूड चित्रपट इंडस्ट्रीतील दिग्गज दिग्दर्शक संजय लीला भन्साळी रणदीप हुड्डा आणि रश्मिकासोबत एक सुपरहिट चित्रपट करणार होते. सूत्रांच्या माहितीनुसार, रश्मिकाने नकार दिल्यानंतर तो प्रोजेक्ट पुढे जाऊ शकला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT