मनोरंजन

’83’ movie : रणवीर सिंग-कपिल देव यांचा किसींग फोटो व्हायरल

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन :

१९८३ मध्ये भारताने पहिल्यांदा विश्वचषक जिंकून इतिहास रचला होता. तेव्हापासून जवळपास ३८ वर्षे उलटून गेली आहेत. या विश्वचषक विजयाच्या कहाणीवर आधारीत '८३' हा ('83' movie) चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झालाय. बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग या चित्रपटात कपिल देवच्या भूमिकेत आहे. याआधी चित्रपटाचे स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. यावेळी रणवीर सिंग सह दीपिका पादुकोण, कपिल देव यांना हजेरी लावली. यावेळी चर्चा रंगली ती गळाभेटीची. ही गळाभेट होती कपिल देव आणि रणवीर सिंहची. इतकचं नाही तर अतरंगी फॅशन करणाऱ्या सिंहने देव यांना किस केलं. आणि मीडियाच्या कॅमेऱ्याचा एकचं फ्लॅश त्यांच्यावर पडला.('83' movie)

ranveer singh

सोशल मीडियावर दोघांचा फोटो चांगलाच व्हायरल झाला. दोघे एकमेकांना आलिंगन देताना दिसताहेत. रणवीर कपिल यांचा किस घेताना दिसत आहे. पण, या क्षणासाठी त्याला ट्रोलदेखील केलं जात आहे. स्क्रिनिंगवेळी दोघे एकमेकांसोबत मस्ती करताना दिसले होते. रणवीरने पांढरा कोट तर कपिल देव यांनी निळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे.

'83' चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खानने केले आहे. रणवीरने कपिल देव यांची भूमिका साकारलीय तर दीपिका पादुकोणने कपिल देव यांच्या पत्नीची भूमिका साकारलीय.

रणवीर आणि दीपिकाशिवाय या चित्रपटात पंकज त्रिपाठी, बोमन इराणी, हार्डी संधू आणि ताहिर राज भसीन हे कलाकार आहेत.

SCROLL FOR NEXT