माय पार्टनर म्हणत तेजश्री प्रधाननं शेअर केला ‘त्याचा’ फोटो | पुढारी

माय पार्टनर म्हणत तेजश्री प्रधाननं शेअर केला 'त्याचा' फोटो

पुढारी ऑनलाईन

सुंदर मराठमोळी अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या एका फोटोमुळे चर्चेत आलीये. फक्त एक फोटो तिने इन्स्टावर शेअर केलाय. पण, या फोटोमुळे तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. तेजश्री प्रधानने बबड्यासोबतचा एक सुंदर फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये दोघेही हसताना दिसताहेत. पण, खास गोष्ट ही की, तिने दिलेल्या कॅप्शनमुळे तिची चर्चा होताना दिसतेय.

तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये सोहम अर्थातचं बबड्या दिसतोय. अग्गंबाई सासूबाई या मराठी मालिकेत दोघांनी भूमिका साकारली होती. आशुतोष पत्की याने बबड्याची भूमिका साकारली होती. दोघांनी पती-पत्नीची भूमिका साकारली होती. निवेदिता जोशी-सराफ यांनी आसावरीची भूमिका साकारली होती.

तेजश्रीने फोटोला कॅप्शन लिहिलीय की- My partner- n Work, In crime, In creativity, In fights, In laughter, In Sarcasm, In Gossiping, in almost everything. except🙄🙄🙄 In cheating (when i want to have all the junk food on this planet😏) … Not even on Birthdays 🙊

माय पार्टनर अशी कॅप्शन लिहिल्यामुळे ‘हा पार्टनर?’ असे म्हणत चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केलंय. तिने आशुतोषला happy birthday to My partner-म्हटल्यामुळे तिची चर्चा रंगलीय. तिच्या या फोटोला प्रतिक्रिया देत आशुतोषने लिहिलंय-Btw Thnk you soo much 😀🤗 and theres an exception ‘Pizzas’ 🤤. Its all fun and games until the jeans don’t fit anymore 🤣😂.

तेजश्री आणि आशुतोष यांच्यात चांगली मैत्री आहे. तिने आशुतोषच्या वाढदिवसानिमित्त ही पोस्ट टाकली होती. पण, तिने माझा पर्टनर असा उल्लेख केल्याने तिला कमेंट्स येताहेत. आशुतोशषा वाढदिवसाच्या शुभेच्छा तर मिळत आहेतचं. शिवाय, त्याबरोबर, हा लाईफ पार्टनर का असाही सवाल अनेकांना केलेला दिसतो.

तेजश्रीला एका मुलाखतीत लग्नाविषयी विचारण्यात आलं होतं की, ‘मला खरंच लवकरात लवकर लग्न करून सेटल व्हायला आवडेल. मला खरंच कोणी मुलगा मनापासून आवडला तर मी कसलीही वाट न बघता पुढच्या सहा महिन्यातदेखील लग्न करून सेटल होईन.’

Back to top button